शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आजपासून पुन्हा किलबिलाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:46 IST

पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हे उद्यान मंगळवारी खुले केले जाणार आहे.

डोंबिवली - पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हे उद्यान मंगळवारी खुले केले जाणार आहे. विविध खेळणी, जॉगिंग ट्रॅक, व्हर्टिकल गार्डन आणि ओपन अ‍ॅम्पीथिएटर आदी मनोरंजनाच्या सुविधांनी सज्ज झालेल्या या उद्यानाला श्री गणेश मंदिर संस्थानाने कार्पाेरेट लूक दिला आहे. त्यामुळे या उद्यान पुन्हा बालगोपाळांच्या किलबिलाट सुरू होणार आहे.केडीएमसीने त्यांच्या अखत्यारीतील काही उद्याने सामाजिक संस्थांना विकसित करण्यासाठी दिली आहेत. यापैकी पूर्वेतील नेहरू रोडवरील महापालिकेचे छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी श्री गणेश मंदिर संस्थानकडे पाच वर्षांसाठी देण्यात आली आहे. हे उद्यान आबालवृद्धांना फेरफटका मारण्यासाठी तसेच तरुण व लहान मुलांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण मानले जाते. १९९० च्या दशकात याठिकाणी सुरू झालेली मोराची गाडी बाळगोपाळांसाठी विशेष आकर्षण होती. उद्यानातील मोराच्या गाडीची रपेट मारण्यासाठी लहानग्यांच्या रांगा लागत असत. पण काही वर्षांपासून पुरेशा देखभाल आणि दुरुस्तीअभावी ही गाडी बंद पडली होती. तसेच उद्यानातील खेळण्यांचीही वाताहत झाली होती. अखेर श्री गणेश मंदिर संस्थानाने पुढाकार घेत या उद्यानाचे नूतनीकरणाचे काम हाती घेऊ न उद्यानाला कार्पाेरेट लूक दिला. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने मंगळवारपासून हे उद्यान खुले होत असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली. त्यामुळे बच्चेकंपनीला याठिकाणी उन्हाळी सुट्टीत मनसोक्त खेळाचा आनंद लुटता येणार आहे.मोराची गाडीऐवजी मिनी ट्रेन धावणार : नवा लूक लाभलेल्या उद्यानात आता मोराची गाडी पाहायला मिळणार नाही. त्याऐवजी बालगोपाळांसाठी अहमदाबादवरून विशेष मिनी ट्रेन आणण्यात आली आहे. उद्यानाला तीन प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. २८ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानात २५ खेळणी आहेत. ३ ते ६, ६ ते ९ आणि ९ ते १२ अशा वयोगटांनुसार साजेशी खेळणी बसवण्यात आली आहेत. उद्यानात जॉगिंग ट्रॅक आहेच, त्याचबरोबर उद्यानाच्या भोवताली घातलेल्या संरक्षक भिंतीवर कार्टून्ससह अन्य छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. याठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून हिरवळीचा साज चढविला जाणार आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही असून ओपन अ‍ॅम्पी थिएटर आदी सुविधा येथे देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :dombivaliडोंबिवली