शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीचा मनोरमानगर बसथांबा फेरीवाल्यांनी ढापला; मनसेचे ठाणे परिवहन प्रशासनाला ५०० सह्यांच्या मागणीचे पत्र       

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 16:28 IST

अनधिकृत पार्किंगच्या मगरमिठीतून थांब्याची सुटका करा 

ठाणे : बेकायदा फेरीवाले आणि अनधिकृत पार्किंगने मनोरमानगर येथील टीएमटी बस थांब्याला पुरते वेढले आहे. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागतो. थांब्यावर बस उभी राहत नसल्याने नागरिकांची होणारी त्रेधातिरपीट रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनोरमानगर परिसरात एकदिवसीय सह्यांची मोहीम राबवली. या ५०० नागरिकांच्या सह्यांसह निवेदन परिवहन प्रशासनाला सादर केले जाणार आहे. त्यामुळे बसथांब्याची या बजबजपूरीतून सुटका होण्याची शक्यता आहे.

मनोरमानगर येथून दररोज हजारो प्रवासी ठाणे रेल्वे स्थानक परिसरासह आजूबाजूला जाण्यासाठी टीएमटी बस सेवेवर अवलंबून असतात. मात्र या बस थांब्यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. तसेच २००६ पासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनोरमानगर येथील या बस थांब्याबाबत परिवहन व्यवस्थापकाकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र फेरीवाल्यांचे कारण देऊन या बस थांब्यावर चालकांकडून बस थांबवली जात नाही. या थांब्यापासुन १५० मीटर अंतरावर कोठेही बस थांबते. त्यामुळे प्रवाशांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवली. यावेळी ५०० पेक्षा अधिक प्रवाशांनी याठिकाणी असलेले फेरीवाले हटवून थांबा मोकळा करण्याची मागणी केली. यावेळी मनसे ठाणे सचिव निलेश चव्हाण, प्रभाग अध्यक्ष भास्कर चव्हाण, सहसचिव वसंत लोखंडे, बाळु कांबळे, विभागअध्यक्ष हेमंत मोरे, उपविभाग अध्यक्ष विशाल पाटील, शाखाअध्यक्ष आकाश वानखेडे, उपशाखा अध्यक्ष हेमंत गायकवाड, सचिन चाबुकस्वार, प्रीतम डुलगज, रवी शेंदाडे, आतिश कांबळे, आकाश शिंदे आणि शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते. प्रशासनाकडून टोलवाटोलवी 

अनधिकृत फेरीवाले हटवले अतिक्रमण विभागाची जबाबदारी, बेकायदा पार्किंग बंद करणे वाहतूक शाखेचे काम तसेच बस थांब्यांवर बस थांबवले परिवहन प्रशासनाच्या अखत्यारीत या विविध यंत्रणांच्या टोलवाटोलवीत प्रवाशांचे मरण होत आहे. याप्रश्नी लवकर तोडगा न निघाल्यास मनसे स्टाईल दणका दिला जाईल, असा इशारा ठाणे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसे