शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

पाणीपट्टीसह टीएमटी तिकीटदरवाढ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 02:01 IST

संजीव जयस्वाल यांची माहिती । लोकप्रतिनिधींची समजूत काढणार

ठाणे : ठाणेकरांवर पाणीदरवाढ आणि टीएमटीच्या तिकीटदरवाढीचा बोजा टाकण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. मात्र, आर्थिक संकट पाहता पाणीदरवाढ आणि परिवहनसेवेच्या प्रवासी भाड्यात वाढ करणे आवश्यक असल्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शनिवारी स्पष्ट केले.

२००८ पासून पाणीदरवाढ केलेली नसल्याने उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत जवळपास १०० कोटींची असून टीएमटीलादेखील दरवर्षी २०० ते २५० कोटींचे अनुदान द्यावे लागत आहे. भविष्यात ते देता आले नाही तर कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे या दरवाढीसंदर्भात एक बैठक घेऊन लोकप्रतिनिधींची समजूत काढल्यानंतर महासभा या प्रस्तावांवर योग्य निर्णय घेईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. घरगुती वापराच्या पाणीपट्टीवर ४० ते ५० टक्के दरवाढीचा निर्णय घेतल्यानंतर वाणिज्यस्वरूपाच्या पाणीदरातदेखील वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

घरगुती पाणीबिलांवर ४० ते ५० टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. तर, वाणिज्यस्वरूपातील पाणीदरात १५ ते ३० रुपयांवरून ३० ते ६० रुपयांची वाढ प्रतिहजार लीटरमागे प्रस्तावित केली आहे. पाणीपुरवठा विभागाचा महसुली खर्च हा २०२.९२ कोटी आणि उत्पन्न १२६ कोटी आहे. ही तूट ७६.९२ कोटींची आहे. त्यामुळे ती भरून काढण्यासाठी आता विविध स्वरूपात ही करवाढ प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे टीएमटीच्या तिकीटदरातही वाढ करण्याचा प्रस्ताव असून त्यात २० टक्के दरवाढ करण्यात येणार आहे.अन्यथा परिवहनचा डोलारा कोसळेलइंधनाचे दर वाढले असून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमुळे ही दरवाढ दोन वर्षे केली नसल्याचे सांगून ती दरवाढ आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून बऱ्याच बस घेतल्या होत्या. त्यांचे १० वर्षे आयुर्मान संपल्याने नव्या बस घेणे आवश्यक आहे. याशिवाय, दरवर्षी टीएमटीला पालिकेच्या अर्थसंकल्पातून २०० ते २५० कोटींचे अनुदान द्यावे लागत आहे.भविष्यात इच्छा असूनही जर निधी द्यायला जमले नाही, तर टीएमटीची परिस्थिती कठीण होऊन तिचा डोलारा कोसळण्याची भीती असून यासाठी परिवहन सक्षम करण्यासाठी ही दरवाढ करणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याशिवाय, २००८ पासून पाण्याची दरवाढदेखील केली नसून सर्व ठिकाणी मीटर लागल्यानंतर हे रेट सुधारित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका