शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीच्या १५० बस दुरुस्तीसाठी पडून, दुरुस्तीचा मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 03:48 IST

दुरुस्तीचा मुहूर्त सापडेना : ठाणे परिवहनकडून चांगली सेवा नाही, जीसीसी बसचे उत्पन्न दुप्पट

ठाणे : ठाणेकरांना नव्या वर्षात चांगली सेवा देण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू असले तरी बस दुरुस्तीचा मुद्दा काही सुटलेला नाही. सध्याच्या घडीला परिवहनच्या सुमारे १५० बस दुरुस्तीसाठी वागळे आगारात धूळखात पडून आहेत. यामुळे परिवहनचे उत्पन्न तर घटत आहेच, शिवाय ठाणेकरांना चांगली सेवा देण्यास परिवहन सेवा कमी पडत असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली आहे. त्यातही जीसीसी बसचे दिवसाचे उत्पन्न हे सुमारे १३ लाख रु पये आहे, तर परिवहनच्या बसचे उत्पन्न हे तीन लाखांनी कमी आहे.

ठाणे परिवहन सेवेतील नादुरुस्त बस दुरुस्त करून त्या रस्त्यावर उतरविण्यासाठी मागील वर्षीच निर्णय झाला होता. परंतु, अद्यापही त्यांच्या दुरुस्तीचा मुहुर्त काही सापडला नसल्याचे दिसत आहे. आजघडीला परिवहनच्या ताफ्यात ३१७ बस आहेत. त्यापैकी १५० हून कमी बस रस्त्यावर धावत आहेत. त्याचा मोठा फटका उत्पन्नाला बसत आहे. त्यातही ठाणे परिवहन सेवच्या दिवसाच्या उत्पन्नावरसुद्धा परिणाम झाला आहे. तिचे आजचे उत्पन्न हे २३ लाखांच्या आसपास आहे. त्यात सर्वाधिक वाटा हा जीसीसीच्या माध्यमातून चालणाऱ्या बसचा आहे. या बसचे दिवसाचे उत्पन्न हे १२ ते १३ लाखांच्या घरात आहे. या बसना एक किमीच्या मागे ५६ रु पये अदा केले जातात. त्यांना दिवसाला १८० किमी धावणे बंधनकारक आहे. यातील १९० पैकी १७८ बस रस्त्यावर धावत आहेत. तर वागळे आगारातून बाहेर पडणाºया बसचे उत्पन्न ४ लाख ६६ हजार ६४८ रु पये, कळवा २ लाख १ हजार १४९, मुल्लाबाग येथील वातानूकुलीत २३ बसचे ३ लाख ८५ हजार ५२५ रु पये उत्पन्न आहे. यातून परिवहनचे उत्पन्न कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.ठाणे परिवहनच्या १५० च्या आसपास बस वागळे आणि कळवा आगारात दुरुस्तीअभावी उभ्या आहेत. त्या वेळेत दुरुस्त झाल्या तर त्याचा फायदा ठाणेकरांना होणार असून परिवहनच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. दुसरीकडे अशाप्रकारे नादुरुस्त बसची जी संख्या वाढत आहे, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच दुरुस्तीची कामे केली जाईल, असे परिवहनचे मत आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणे