शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाचे जाहिरात प्रस्ताव रद्द, प्रशासनाला महासभेचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:38 IST

आॅटोरिक्षा स्टॅण्डसह शौचालये बांधून त्यावर जाहिरात करणे, तसेच आॅनलाइन जाहिरात परवानगी देण्याबाबतचे प्रशासनाचे प्रस्ताव शुक्रवारी सर्वसाधारण सभेने सर्वानुमते फेटाळून लावले.

ठाणे : आॅटोरिक्षा स्टॅण्डसह शौचालये बांधून त्यावर जाहिरात करणे, तसेच आॅनलाइन जाहिरात परवानगी देण्याबाबतचे प्रशासनाचे प्रस्ताव शुक्रवारी सर्वसाधारण सभेने सर्वानुमते फेटाळून लावले. यासाठी नेमण्यात येणाऱ्या एजन्सीवर होणाºया खर्चापेक्षा कितीतरी कमी निधी हा या खात्यातील कर्मचाऱ्यांवर होत असून, उत्पन्नदेखील चांगले असल्याने हा प्रस्तावच रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर, नगरसेवकांनी प्रशासनास कोंडीत पकडून हे प्रस्तावच रद्द केले.या महासभेत नालेसफाई तसेच खड्ड्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर, विषयपत्रिकेला सुरुवात झाली. सुरु वातीला कौसा हॉस्पिटलमध्ये उपकरणे खरेदी आणि स्टाफभरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर, जाहिरात विभागाचे वादग्रस्त प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले. या प्रस्तावांसंदर्भात पालिका कशा पद्धतीने जाहिरातदारांचे भले करत आहेत, या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनीही या प्रस्तावांना विरोध केला. आॅटोरिक्षा स्टॅण्डच्या प्रस्तावाला विरोध करताना राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी गरीब रिक्षाचालकांना दुपारी या स्टॅण्डवर बसता यावे, तसेच यामधून काही कर्करोग झालेल्या रु ग्णांना मदत करता यावी, असा यामागचा उद्देश असला, तरी या रिक्षास्टॅण्डसाठी प्राइम लोकेशनवरच जागा का देण्यात आल्या, असा सवाल केला. चांगला उद्देश असता तर अनेक ठिकाणी हे स्टॅण्ड उभारता आले असते. मात्र, जिथे उत्पन्न मिळणार नाही, त्या जागा टाळण्यात आल्याने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. इतर नगरसेवकांनीही हीच भूमिका घेतली. भाजपचे सुनेशी जोशी यांनी आधी अनधिकृत रिक्षास्टॅण्ड हटवण्याची मागणी केली. त्यानंतर, हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.जाहिरात एजन्सीवर कोट्यवधींची मेहरबानीया प्रस्तावानुसार ज्या एजन्सीच्या माध्यमातून हे काम होणार आहे, त्या एजन्सीला सुरु वातीला १५ लाख रु पये आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला १० लाख रु पये दिले जाणार आहेत. म्हणजेच, वर्षाला या एजन्सीला एक कोटी २० लाख रु पये दिले जाणार असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.मात्र, सध्या जाहिरात विभागातील आस्थापनेवर तीन लाख १९ हजार इतका खर्च येत असून सध्या या विभागाचे उत्पन्न १५ कोटींच्या घरात आहेत. या १५ कोटींपैकी एक कोटी २० लाख या एजन्सीला द्यावे लागणार आहे. मात्र, ही एजन्सी केवळ सर्व्हे करून आपल्याला वसुलीचे आदेश देणार आहे.हा नवीन सल्लागारांवर पैसे खर्च करण्याचा पालिकेचा प्रकार असून हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर, मिलिंद पाटणकर यांनीदेखील जर सर्व्हे संबंधित एजन्सी करणार असेल, तर महापालिकेकडे शहरात किती अनधिकृत होर्डिंग्ज आहेत, याची माहिती उपलब्ध नसल्याचे लक्ष वेधले. अखेर हा प्रस्तावदेखील रद्द करण्यात आला.पदपथांवर शौचालयेसर्वात धक्कादायक बाब म्हणजे एसी टॉयलेट बांधून त्यावर जाहिरात करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करत असताना अनेक ठिकाणी शौचालयांच्या जागाच बदलण्यात आल्या असल्याचे महासभेत उघड झाले.यामध्ये काही शौचालये तर फुटपाथवर बांधण्यात आले असल्याचे नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. ज्या शौचालयांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत, त्याठिकाणी नागरिकांचा विरोध झाला म्हणून त्या बदलण्यात आल्या असल्याचा खुलासा उपायुक्त संदीप माळवी यांनी केला. मात्र, या उत्तरावर समाधान न झाल्याने अखेर हा प्रस्तावच रद्द करण्यात आला.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणे