शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १२४ इमारतींना स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे पालिकेने काढले फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 17:01 IST

अन्यथा २४ हजारांचा दंड ठोठावणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून त्यानुसार आता अतिधोकादायक इमारती रिकाम्या करुन तोडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. असे असतांनाच आता शहरातील ३० वर्षे जुन्या असलेल्या १२४ इमारतींना तत्काळ स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे फर्मान ठाणे  महापालिकेच्या वतीने काढण्यात आले आहे. त्यामुळे या इमारतीत राहणा:या रहिवाशांनी धावपळ सुरु झाली आहे. त्यातही ज्यांना इमारतींचे ऑडीट करायचे असेल त्यांनी महापालिकेच्या पॅनवरील ऑडीटर कडून ते करु न घेऊ शकतात असे आवाहन करीत त्यांची यादी देखील पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

         ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यापूर्वी दरवर्षी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा यादी जाहीर केली जात आहे. त्यानुसार यंदा ४५५६ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यातील ७३ इमारती या अतिधोकादायक असून त्या इमारती खाली करुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार आतार्पयत ३० इमारतींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. परंतु आता यापुढेही जाऊन शहरातील ३० वर्षे जुन्या असलेल्या इमारतींना देखील पालिकेने नोटीसा बजावल्या असून या नोटीसीद्वारे संबधींत इमारत धारकांना स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबधींतानी तत्काळ ऑडीट करुन घ्यावे आणि त्याचा अहवाल महापालिकेस सादर करावे अशा सुचनाही पालिकेने दिल्या आहेत. ३० वर्षे इमारती रहिवास वापरासाठी योग्य आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी पालिकेने अशाप्रकारचे आदेश दिले आहेत. ठाणो महापालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्यांमार्फतच इमारतींचे ऑडीट करून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या अभियंत्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो पालिकेला सादर करण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणा:या इमारतींना २५ हजार रु पये किंवा वार्षिक मालमत्ता कर यापैकी जी जास्त रक्कम असेल, तितका दंड आकारण्याची अधिनियमात तरतुद असल्याचे प्रशासनाने नोटीसमध्ये नमुद केले आहे. त्यामुळे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार आली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका