शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

भिवंडीत नेहमीच्या वाहतूक कोंडीला कंटाळून विद्यार्थी उतरले रस्त्यावर; रस्त्यावरच भरवली शाळा

By नितीन पंडित | Updated: August 2, 2024 20:58 IST

विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर उतरून अभूतपूर्व असा रस्ता रोको आंदोलन करून तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला होता.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: भिवंडी ठाणे महामार्गावरील अंजुर फाटा ते कशेळी या भागात दररोजची वाहतूक कोंडी होत असल्याने असंख्य वाहन चालक, नागरीक,विद्यार्थी स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या दररोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून काल्हेर येथील परशुराम धोंडू टावरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर उतरून अभूतपूर्व असा रस्ता रोको आंदोलन करून तब्बल दोन तास रस्ता रोखून धरला होता.

या रस्त्यावर अंजुर फाटा ते काल्हेर या मार्गावर दररोज वाहतूक कोंडीचा सामना स्थानिक राहनाळ,पुर्णा,काल्हेर येथील ग्रामस्थांना करावा लागत आहे .तर या वाहतूक कोंडीत असंख्य चाकरमानी प्रवासी अडकून पडत आहेत.या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही तर शाळा सुटल्यावर दोन किलोमीटर अंतरावरील घरी पोहचण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत.या दररोजच्या त्रासाला कंटाळून अखेर कोपर - काल्हेर येथील परशुराम टावरे माध्यमिक विद्यालय व माधवराव पाटील बालमंदिर येथील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे शाळे बाहेरील रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा तब्बल तीन तास खोळंबा झाला होता.

टॅग्स :bhiwandiभिवंडी