शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून व्हिडीओ व्हायरल करून तरुणाची लोकलखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 05:53 IST

घरसंसार चालविण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या ४० टक्के व्याजाच्या तगाद्याला कंटाळून एका तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून २४ जानेवारीला लाेकलखाली आत्महत्या केली.

उल्हासनगर :

घरसंसार चालविण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या ४० टक्के व्याजाच्या तगाद्याला कंटाळून एका तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून २४ जानेवारीला लाेकलखाली आत्महत्या केली. कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी बळी गेलेल्या तरुणाच्या वडिलांनी केली आहे. उल्हासनगर कॅम्प नं. ५ परिसरात गिरीश चुग कुटुंबासह राहत होते. गिरीश यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुलगे, वृद्ध आई-वडील आहेत. परिसरातील एका गारमेंट दुकानात कामाला असलेल्या गिरीश यांच्या दोन सहकारी मित्रांनी चुगली केल्याने, त्यांना दोन महिन्यांपूर्वी मालकाने कामावरून काढले. हाताला काम नसल्याने, घरसंसार चालविण्यासाठी त्यांनी काहीजणांकडून दरमहा ४० टक्के व्याजाने एक लाख रुपये उसने घेतले. मात्र, ४० टक्के दरमहा व्याज देऊ न शकल्याने, व्याजाच्या पैशांसाठी त्यांच्यामागे तगादा सुरू झाला. व्याजाने पैसे देणाऱ्यांनी थेट घरी मोर्चा वळविल्याने, गिरीश हादरून गेले हाेते. 

वृद्ध वडिलांचा टाहोएकुलता एक मुलगा असलेला गिरीश पत्नी, दोन लहान मुलासह आम्हा वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करायचा. त्याच्या मृत्यूने आमचा सांभाळ कोण करणार?, असा प्रश्न करून त्यांच्या वडिलांनी टाहो फोडला. 

सर्वांना सांभाळ, मला माफ कर गिरीश यांनी २४ जानेवारीला अंबरनाथ व बदलापूरमधील रुळावर आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्याजाच्या पैशांचा तगादा आणि चुगली करणाऱ्या सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. दशरथ, रमेश सिंग, गोलू सिंग, गायकवाड, जय, विनोद यांच्यावर कारवाई करावी. तीन व एक वर्षाच्या मुलाचा व वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ कर. मला माफ कर, असे म्हणत त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात तक्रार देण्याची पत्नीला सूचना केली. 

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल