शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सल्लागार असूनही टीएमटी एम्प्लॉइज युनियनवर आंदोलनाची वेळ; २४५ कोटींच्या थकबाकीकरिता निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 06:05 IST

अनेक वर्षे शिवसेनेचीच सत्ता असलेल्या परिवहन प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी युनियनने आंदोलन केले. समितीची बैठक सुरू असतानाच हे आंदोलन झाल्याने सभापती विलास जोशी यांना आंदोलनकर्त्यांची समजूत काढावी लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अनेक वर्षांपासून परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांची २४५ कोटींची देणी रखडली आहेत. देणी मिळावीत, यासाठी कर्मचाऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सल्लागार असलेल्या टीएमटी एम्प्लॉइज युनियनवरच आंदोलनाची वेळ आल्याने शिवसेनेची नाचक्की झाली आहे. 

अनेक वर्षे शिवसेनेचीच सत्ता असलेल्या परिवहन प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी युनियनने आंदोलन केले. समितीची बैठक सुरू असतानाच हे आंदोलन झाल्याने सभापती विलास जोशी यांना आंदोलनकर्त्यांची समजूत काढावी लागली. अखेर आश्वासन देऊन या सर्व आंदोलकांची बोळवण करण्यात आली.

तत्कालीन शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परिवहन सेवेची सुरुवात १९८९ मध्ये झाली. त्यांच्याच मार्गदर्शनाने टीएमटी एम्प्लॉइज युनियनची स्थापना झाली. त्या काळात परिवहन सेवेने उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला. दिघे यांच्या पश्चात राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सूत्रे हातात घेतली. टीएमटीमध्ये एकूण १,६५४ कामगार कायम असून, ४५० कंत्राटी कामगार आहेत. तर ९०० कामगार हे सेवानिवृत्त झाले असून, कामगारांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. यामध्ये ६१३ कर्मचाऱ्यांना कायम करणे. १२/२४ वर्षांच्या आश्वासित वेतनश्रेणीचा लाभ देणे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, तसेच वेगवेगळ्या विभागांतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या मागण्या अपूर्ण असल्याने टीएमटीच्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करीत शुक्रवारी वागळे येथील टीएमटीच्या बस डेपोमध्ये आंदोलन छेडले. दरम्यान, परिवहन सभा सुरू असताना संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सभापती, सदस्य आणि टीएमटी व्यवस्थापकांसमोर आपली गाऱ्हाणी मांडली. यावेळी परिवहन सभापती विलास जोशी यांनी त्यांची समजूत काढत मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले.

कर्मचाऱ्यांच्या या आहेत मागण्याn जानेवारी २०१६ पासूनचा न दिलेला महागाई भत्ता मिळावाn २०११ पासूनचे रखडलेले सार्वजनिक सुट्यांचे वेतन मिळावेn एप्रिल २००० पासूनचा वैद्यकीय भत्ता मिळावाn एप्रिल २०१९ पासूनचा रजा प्रवास भत्ता थकबाकी मिळावीn एप्रिल २०१७ पासूनचा शैक्षणिक भत्ता मिळावाn एप्रिल २०१० पासूनचा पूरक प्रोत्साहन भत्ता मिळावाn २००६ ते २०११ सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी शिल्लक आहे.

टॅग्स :thaneठाणे