शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ, छगन भुजबळ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 00:06 IST

पश्चिमेतील माळी समाजमंदिरात एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कल्याण : शेतकऱ्यांवर पीक विमा कंपन्या अन्याय करत आहेत. पंधरा दिवसांत पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही, तर मुंबईतील संबंधित कार्यालयांना हिसका दाखवण्याची भाषा सत्तेत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. सत्तेत असूनही सेनेवर हिसका दाखवण्याची वेळ येत आहे, म्हणजे हे सरकार कुठेतरी कमी पडत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.पश्चिमेतील माळी समाजमंदिरात एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी ही टीका केली. महाराष्ट्रातील दुष्काळ आम्ही संपवू, असे सध्याच्या सरकारने २०१४ मध्ये सांगितले होते. मात्र, महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातही ठिबक सिंचन, पाझर तलाव यासारख्या योजना राबवण्यात आल्या होत्या. हे सर्व सध्याच्या सरकारने एकत्रित करून त्याला ‘जलयुक्त शिवार’ असे नाव दिले आहे.पन्नास वर्षे कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने काही केले नाही म्हणून दुष्काळ पडला, असे त्यांचेम्हणणे होते. मग जर आता तुम्ही सगळी कामे केली आहेत, तर महाराष्ट्रात दुष्काळ कसा पडला, असा प्रश्नही भुजबळ यांनी सरकारला विचारला.मोदींच्या विजयाबाबत संभ्रमपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत भुजबळ म्हणाले की, हा मोदींचा विजय आहे की, ईव्हीएम मशीनचा, याबाबत आजही संभ्रम आहे. मोदी विजयी झालेत हे खरे. वंचितला सोबत घेण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या पक्षातील नेत्यांना आंबेडकरांसोबत येणाºया निवडणुकीबाबत बोलण्यास सांगितले आहे. आमच्या पक्षातील नेते किंवा पदाधिकारी हेही त्यांच्यासोबत बोलतील. त्यातून येणाºया विधानसभा निवडणुकीत काहीतरी चांगलेच घडेल.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ