शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

आत्महत्या करण्याची वेळ! ट्रॅव्हल्सचालकांची व्यथा; व्यवसायावर गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 23:19 IST

वर्षभरापासून कोरोनाची लाट सुरू असून ती अद्यापही शमली नाही. त्यामुळे त्याचा साहजिकच सर्वांवर परिमाण झाला आहे

अजित मांडकेठाणे  : गेल्या वर्षभरापासून कधी कमी कधी जास्त प्रमाणात वाढणाऱ्या कोरोनामुळे ठाण्यातील खाजगी ट्रॅव्हल्सचालकांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसत आहे. कोरोना कमी झाल्याने त्या काळात डबघाईला आलेला व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता पुन्हा त्याची दुसरी लाट आल्याने व्यवसाय जेमतेम ५ ते १० टक्क्यांवर आला आहे. त्यातही आता बुकिंग मिळविण्यासाठी काही ट्रॅव्हल्सचालकांमध्ये स्पर्धा लागली असून, त्याचा फटकाही बसत आहे. 

वर्षभरापासून कोरोनाची लाट सुरू असून ती अद्यापही शमली नाही. त्यामुळे त्याचा साहजिकच सर्वांवर परिमाण झाला आहे. त्यातही खाजगी ट्रॅव्हल्सचालकांचे यात कंबरडे मोडले आहे. अनेक व्यावसायिकांवर हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. मार्चअखेर असल्याने बँकांचे हप्ते थकविल्याने बँका गाड्या जप्त करू लागल्या आहेत. कोरोनाआधी १०० टक्के सुरू असलेला व्यवसाय आता १० टक्क्यांच्या आसपास सुरू असून त्यातून घर कसे चालवायचे, चालकांचे पैसे कसे द्यायचे असा पेच त्यांच्या समोर उभा ठाकला. त्यातही सध्या व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न सुरू असताना अनेक ट्रॅव्हल्सचालकांत सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. पहिले प्रत्येक वाहनांचे दर हे निश्चित होते. परंतु, आता कमी दरातही अनेक ट्रॅव्हल्सचालक तयार होत असल्याने त्याचाही फटका अनेकांना बसला आहे. 

त्यातही चालकांचे पैसे कसे द्यायचे, गाड्या दारात उभ्या राहिल्याने त्यांचीही कामे आता निघू लागली आहेत. त्यांचा मेन्टेनन्स शिल्लक आहे. रस्त्यावर त्या निघतील तरच या व्यवसायात असलेल्यांचे पोट भरणार आहे. परंतु, गाड्याच रस्त्यावर धावत नसल्याने या सर्वांचे गणित जुळवताना नाकीनऊ आले असून, आता तर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे ट्रॅव्हल्सचालक सांगत आहेत.  

गाडी रुळावर येत होती; पण मधल्या काळात कोरोना कमी झाल्याने व्यवसाय ६० टक्यांपर्यंत सावरला होता. परंतु, पुन्हा कोरोनाची लाट आल्याने, व्यवसायावर त्याचा परिणाम झाला असून, सध्या ५ ते १० टक्केच व्यवसाय सुरू आहे. त्यातही बँकवाले गाड्या जप्त करू लागले आहेत.

बँकेचे हप्ते थकले मधल्या काळात कोरोना कमी झाल्याने बँकेचे काही हप्ते भरले होते. परंतु, आता पुन्हा मागील तीन ते चार महिन्यांपासून हप्ते थकल्याने बँकवाल्यांनी मार्च अखेरचे कारण देऊन गाड्याच जप्त करण्यास सुरुवात केली आहे.- विकास शेलार, ट्रॅव्हल्समालक

आता तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. चालकांचा पगार कसा द्यायचा? बँकेचे हप्ते कसे भरायचे? इमारतीचे मेन्टेनन्स शिल्लक आहे. शासनाकडे अर्ज करूनही त्यावर अद्यापही काही तोडगा निघालेला नाही- व्ही. के. शेट्टी,  ट्रॅव्हल्समालक

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस