शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी कारवाईच्या सावटामुळे स्वातंत्र्यदिनी  ठाण्यातही कडेकोट पोलीस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 01:41 IST

दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांनी देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातही संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी केली असून वाहनांचीही कसून तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्दे शहरात मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदीपोलीस करणार कसून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांनी देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातही संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी केली असून वाहनांचीही कसून तपासणी केली जात आहे. दरम्यान, ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजून पाच मिनिटांनी साकेत मैदानावर ध्वाजारोहणाचा कार्यक्र म होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर पोलिसांनी यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्र मासाठी परिपत्रक काढले आहे. त्याद्वारे काही सूचना तसेच आवाहनही केले आहे. मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम साकेत मैदानावर होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हाभर एकाचवेळी म्हणजे सकाळी ९ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा आयोजित केला जावा, असे पोलिसांनी सूचित केले आहे. दहशतवादी कारवाईची शक्यता लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणांनी देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर शहरात येणाऱ्या तसेच जाणाºया मार्गांवर नाकाबंदी केली असून संशयास्पद वाहनांची आणि व्यक्तींचीही तपासणी केली जात आहे. चौका-चोकातही पोलीस तैनात केले असून शहरातील पेट्रोलिंग आणि संशयास्पद ठिकाणांवर अचानक तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणांसह अतिसंवेदनशील ठिकाणीही टेहळणी केली जात आहे. शुक्र वारी मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाणे रेल्वे स्थानकातही बॉम्ब शोधक नाशक पथकाद्वारे रेल्वेच्या सुरक्षा दलाचे प्रभारी अधिकारी भूपेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीही करण्यात आली. ठाणे, मुंब्रा, कल्याण आणि जवळपासच्या स्थानकांवर सुरक्षेच्या संदर्भात शोध मोहिमेचा भाग म्हणून मोठ्या संख्येने महिला सुरक्षा दलांनाही तैनात केल्याचे सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी