मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या परिवहन विभागातील तिकीट घोटाळाप्रकरणी कंत्राटदाराने कामावरून कमी केलेला वाहक बंडू सूरनार याच्याकडून गैरव्यहाराची ४० हजारांची रक्कम वसूल केली. भार्इंदर ते ठाणे या मार्गावर तिकीट तपासणी करत असताना निसार मुलाणी या तिकीट तपासनीस सूरनारकडील तिकीट मेमोमध्ये ब्लॉकची आकडेवारी टाकलेली नसल्याचे आढळले. निसार व त्याच्या सहकाऱ्याने मेमो व तिकिटांची पडताळणी केली असता तफावत आढळली. त्यांनी नगरभवन येथील परिवहन कार्यालयातील पालिका कर्मचाऱ्यास हा प्रकार निदर्शनास आणून दिला. तपासणीत सूरनार याने तिकिटे घेताना व त्याचा हिशेब देताना मेमोतील आकडेवारीत हेराफेरी केल्याचे निष्पन्न झाले. ९४ हजारांची तिकिटे घेतली असता रक्कम मात्र ५४ हजार इतकीच जमा केली होती. (प्रतिनिधी)
तिकीट गैरव्यवहारातील ४० हजार वसूल
By admin | Updated: January 24, 2017 05:26 IST