शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

गुरुजींच्या दारुपार्ट्यांचा महापूर

By admin | Updated: February 1, 2017 04:24 IST

पाच राज्ये, दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्ष, संघटना वगळता अन्यत्र फारशा चर्चेत नसलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत

ठाणे : पाच राज्ये, दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे राजकीय पक्ष, संघटना वगळता अन्यत्र फारशा चर्चेत नसलेल्या कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत दारूपार्ट्याची चंगळ सुरू असून भेटवस्तू संस्कृतीला ऊत आल्याच्या सुरस कहाण्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत. शिक्षक हेच मतदार असलेल्या या निवडणुकीत मतांना तीन हजारांपर्यंतचा ‘भाव’ आल्याची धक्कादायक चर्चाही रंगली आहे. याबाबत उघडपणे कोणी बोलण्यास तयार नसले, तरी खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू असल्याची कुजबूज शिक्षकांत आहे.ज्यांचा निर्णय पक्का नाही, अशा उमेदवारांच्या मताचा काही दिवसांपर्यंत दोन हजारांवर असलेला भाव शेवटच्या दोन-तीन दिवसांत तीन हजारांवर गेल्याच्या कानगोष्टी शिक्षकांत सुरू होत्या. राजकीय पक्षांनी पाठबळ दिलेल्या संघटना आजवर या निवडणुकीत परस्परांशी लढत. पण युती तुटल्यानंतर शिक्षक परिषद या भाजपप्रणित संघटनेला शिवसेनेच्या शिक्षक सेनेने थेट आव्हान दिले आहे. शेकापतर्फेबाळाराम पाटील यांनी दंड थोपटले आहेत. विधान परिषदेच्या या जागेसाठी राजकीय पक्षांनीच थेट आव्हान दिल्याने तेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. शैक्षणिक संघटनांतील काम हा शिक्षक परिषदेने आजवर प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्याच आधारावर आमदार कपिल पाटील यांची शिक्षक भारतीही मुद्दे घेऊन उतरत होती. मात्र मुख्याध्यापक संघटनेच्या बळावर शिवसेनेने भाजपाची खिचडी साफ करण्याची घोषणा केली. शिक्षक परिषदेचे उमेदवार म्हणून आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व म्हणून रामनाथ मोते यांनी या मतदारसंघावर ठसा उमटविला होता. पण ज्या पद्धतीने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली किंवा तसे चित्र उभे राहिले, त्यामुळे भाजपाप्रणित मतांना धक्का बसेल, असे अंदाज वर्तवले जाऊ लागले. त्यातही अन्य सर्व उमेदवारांनी शैक्षणिक प्रश्न मांडताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून भाजपाला लक्ष्य केल्याने ‘भाजपा विरूद्ध सारे’असेच लढतीचे चित्र उभे राहिले आहे. शिवसेनेने किती शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, असा प्रश्न भाजपाच्या नेत्यांनी उपस्थित केला; तर परिवारातील व्यक्ती घुसवून भाजपाची विचारसरणी मानणाऱ्यांनी किती संस्था बळकावल्या असा शिवसेनेचा सवाल आहे. शिक्षक भारतीने यापुढे जात हे सर्व पक्ष शिक्षणाच्या खाजगीकरणाचा पुरस्कार करणारे आहेत, असा ठपका ठेवल्याने शैक्षणिक मुद्द्यांची राळ उडाली आहे. (विशेष प्रतिनिधी)दारूकारण आणले! : सुशिक्षित मतदारांच्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी अर्थकारणासोबत दारूकारणही आणले आहे. हे सर्व पक्ष खाजगीकरणाचा पुरस्कार करणारे आहेत. त्यामुळे ते शिक्षकांचे प्रश्न किती मांडणार आणि कसे सोडविणार? - कपिल पाटील, शिक्षक आमदार‘फक्त स्नेहभोजन’शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांसाठी मद्याच्या पार्ट्या होत असल्याच्या वृत्ताबाबत कानावर हात ठेवले. कोण करतेय असे, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. आम्ही चर्चा, स्नेहभोजनावर भर दिल्याचे ते म्हणाले. रिंगणातील उमेदवार : या निवडणुकीसाठी शिक्षक परिषदेतर्फे वेणूनाथ कडू, शिक्षक भारतीने अशोक बेलसरे, शिक्षक सेनेने ज्ञानेश्वर म्हात्रे, शेकापने बाळाराम पाटील यांना संधी दिली आहे. मुदत पूर्ण होणारे आमदार रामनाथ मोते बंडखोर करून उभे आहेत. अशोक बहिरव, केदार जोशी, महादेव सुळे, नरसू पाटील, मिलिंद कांबळे हेही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अमर्याद खर्च, उमेदवार ‘सोशल’ सुशिक्षितांचा मतदारसंघ असल्याने आणि सुसंस्कृतपणे निवडणूक लढविली जाईल हे गृहित असल्याने या निवडणुकीत आयोगाने खर्चाला मर्यादा घातलेली नाही. त्यामुळे काही उमेदवारांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याची वर्णने केली जात होती. एकीकडे उपस्थितीसाठी विद्यार्थ्यांबरोबर सेल्फीला शिक्षकांचा विरोध असला, तरी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पसरलेल्या या मतदारसंघातील प्रचारासाठी यंदा सोशल मीडियाचा भरपूर वापर झाला. माहितीचे मेल, नियमित व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर कामाचे तपशील टाकत उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. अशा प्रचारासाठी परवानगीचे आयोगाचे बंधन होते. प्रचार आज संपणार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार बुधवार, १ फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. मतदान शुक्रवारी, ३ फेब्रुवारीला, तर मतमोजणी सोमवारी, ६ फेब्रुवारीला होणार आहे. पसंतीक्रम मतदान पद्धत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत त्याची रंगीत तालीमही करण्यात आली. संस्थाचालकांचा दबावनिवडून येणाऱ्या उमेदवाराने आपले प्रश्न सोडवावे, यासाठी यंदा अनेक संस्थाचालकांनी आपल्या शब्दाखातर एकगठ्ठा मते द्यावी, यासाठी मतदारांना म्हणजेच शिक्षकांना सुचवले आहे. बैठका घेऊन त्यांनी ‘संस्थेचे हित’ कशात आहे, त्याची माहिती दिली. ठिकठिकाणी अशा बैठका झाल्याचे वृत्त आहे.भाजपांतर्गत संघर्षाची किनारनागरपूरमधील निवडणुकीत, प्रचारात मनपासून रस घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणच्या निवडणुकीकडे फारसे लक्ष न दिल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरू होती. एक तर विनोद तावडे यांचा प्रभाव असलेला हा परिसर असल्याने काही नेत्यांनी जाणीवपूर्वक प्रचारात रस घेतला नसल्याचे बोलले जात होते.भेटवस्तू, गाड्या, पार्ट्या यंदाच्या निवडणुकीत मतदारांना घरपोच भेटवस्तू दिल्याचीही चर्चा शिक्षकांत आहे. ज्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही किंवा ज्यांनी विशिष्ट पक्षाची बांधिलकी मानलेली नाही, अशा मतदारांना त्याचा लाभ झाल्याचे समजते. शिवाय मतदान जवळ आल्याने गेला आठवडाभर पार्ट्या दणक्यात सुरू होत्या. मतदानावेळी केंद्रावर शिक्षकांना आणण्यासाठी काही उमेदवारांनी खास गाड्यांची व्यवस्था केल्याचेही सांगितले जात होते.