शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

फेस रीडिंग मशिनचा उडाला बोजवारा, हार्डवेअर अपडेट नाही, म्हणे ठाणे स्मार्ट सिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 03:55 IST

ठाणे महापालिका एकीकडे स्मार्ट सिटीचा गवगवा करीत असतांना दुसरीकडे मात्र पालिकेतील कर्मचारी, अधिका-यांचा पगार हा आजही मस्टरवर सही करूनच काढला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अजित मांडके ठाणे: ठाणे महापालिका एकीकडे स्मार्ट सिटीचा गवगवा करीत असतांना दुसरीकडे मात्र पालिकेतील कर्मचारी, अधिका-यांचा पगार हा आजही मस्टरवर सही करूनच काढला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्मचारी आणि अधिकाºयांना शिस्त लावण्यासाठी पालिकेने सुरुवातीला थम्ब मशिन लावली होती. मात्र, ही यंत्रणा अपयशी ठरल्यानंतर त्यावर उपाय म्हणून थेट फेस रीडिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पालिकेने वापर केला. परंतु मागील चार महिन्यापासून तीही बंद असल्याचे समोर आले आहे. यात हार्डवेअरचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला जात असला तरी प्रत्यक्षात या मशिनचा प्रयोगच सपशेल फसल्याचे दिसत आहे.ठाणे महापालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने एकेक पाऊल पुढे सरकत आहे. परंतु, फेस रीडिंग मशिनच्या उडालेल्या बाजारामुळे पालिका आजही किती अधोगतीकडे जात आहे, याची प्रचिती येत आहे. कर्मचाºयांना शिस्त लागावी, ते कामावर वेळेत हजर राहावेत, कामांचे तास त्यांनी पूर्णपणे भरावेत यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी थम्ब इम्प्रेशनचा फंडा पुढे आणला होता. यासाठी कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी केली. त्यानंतर या मशिन मुख्यालयासह, प्रभाग समिती कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी बसविल्या होत्या. परंतु, या नंतरही अधिकारी, कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारची शिस्त काही लागली नाही. तेव्हादेखील कर्मचारी, अधिकाºयांचा पगार हा हजेरी बुकवर सही करूनच काढला जात होता.एकूणच थम्ब मशिनच्या गाशा गुंडाळल्यानंतर दीड वर्षापूर्वी पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर फेस रीडिंगचा पर्याय पुढे आणला. त्यानुसार मुख्यालयासह प्रत्येक प्रभाग समिती कार्यालये मिळून १७ मशिन बसविल्या. प्रत्येक मशिनसाठी पालिकेने सुमारे ३५ हजारांचा खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली.यामुळे प्रत्येक कर्मचारी, अधिकारी वेळेत कामावर आला आहे का, या माहिती बरोबरच त्याचा चेहरा यामध्ये रीड केला जाणार असल्याने त्यांच्या कामात पारदर्शकता येणार असल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु,अवघ्या दीड वर्षातच पालिकेचा तो फोल ठरल्याची माहिती आहे. मागील चार महिन्यापासून या मशिनचा बाजार उडाला आहे.परंतु याची कर्मचारी अथवा अधिकाºयांना त्याची तोडीसुद्धा कल्पना नाही. कर्मचारी रोजच्या रोज कामावर येतांना आणि जाताना फेस रीडिंग करतात.त्यामुळे आपली हजेरी भरली जात असल्याचे त्यांना वाटत आहे. परंत, प्रत्यक्षात या मशिनचा करारनामा चार महिन्यापूर्वीच संपुष्टात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. हार्डवेअरचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून ही यंत्रणा बंद असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.>पालिकेचा मशिनवर भरवसा नाय काय...फेस रीडिंगची मशिन उपलब्ध असतांनाही पालिकेचा या मशिनवर भरवसाच नसल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. ती मागील चार महिन्यापासून बंद आहे. परंतु, असे असतांनादेखील कर्मचाºयांचा पगार हजेरी बुकवर सही केल्यानंतरच निघत आहे.कर्मचाºयांनी वेळेत कामावर यावे, यासाठी सुरुवातीला थम्ब आणि नंतर फेस रीडिंग मशिनची व्यवस्था पालिकेने केली होती. परंतु असे असतांनादेखील तिचा कोणत्याही प्रकारचा उपयोग अद्यापही झाला नसून हजेरी बुकवर सही करावी लागत असल्याने कभी भी आओ कभी भी जाओ, घर तुम्हाराही है असा कारभार पालिकेत आजही सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणे