शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

अभिजात व अमृत शक्तींना भरतनाट्यम् नृत्यशैलीतून डॉ. पल्लवी नाईक यांनी केले अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:37 IST

नाद, ताल, स्वर, लय या अभिजात व अमृत शक्तींना भरतनाट्यम् नृत्यशैलीतून अभिवादन करण्यात आले. 

ठळक मुद्देअभिजात व अमृत शक्तींना भरतनाट्यम् नृत्यशैलीतून अभिवादनडॉ. पल्लवी नाईक यांनी केले अभिवादनगायन, वादन व नर्तन या कलांचे सदिरीकरण

ठाणे : श्री गणेश क्लचरल अकॅडेमी या संस्थेतर्फे डॉ. सितारा देवी या नर्तन कट्टयात डॉ. पल्लवी नाईक यांनी भरतनाट्यम नृत्य प्रस्तुती केली. नाद, ताल, लय, स्वर या अमूर्त व मूर्त शक्तींना त्यांनी नृत्यातून अभिवादन केले. गुरू स्मिता महाजन यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या मराठी रचनांची निवड नृत्याभिवादन ह्या कार्यक्रमासाठी केली होती. 

      शास्त्रीय नृत्य हि प्रयोगशील कला, या कलेचे सादरीकरण हा येथील सर्वात रंजक अनुभव. ठाण्यातील कलाकारांना सादरीकरणाचा आनंद मिळावा व समाजात या कलांबद्दलची जाणीव वाढावी या हेतूने गुरु डॉ. मंजिरी देव यांनी श्री गणेश क्लचरल अकॅडेमी या त्यांचा संस्थेतर्फे डॉ. सितारा देवी नर्तन कट्टा या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली. गेली तीन वर्ष हा उपक्रम सातत्याने प्रत्यके महिन्याच्या तिसऱ्या रविवारी गडकरी रंगायतनच्या स्वागतकक्षेच्या जागेत संपन्न होत आहे. समाजाभिमुख अशा ह्या उपक्रमात गायन, वादन व नर्तन या कलांचे सदिरीकरण सकाळी ६.३० ते ७.३० या वेळात होते. स्वाभाविकच पाहट पासून तयारी करून कलाकार सकाळी सादरीकरण करतो यात त्याची कलेवरील निष्ठा हि दिसून येते. मराठी रचनांच्या प्रस्तुतीमुळे रसिक प्रेक्षकांना त्यांचे सादरीकरण अधिक भावले. कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच गणेश स्तुतीने केले गेली. या रचनेत गजमुख, शस्त्र व पुष्प धरलेला, शूर्पकर्ण, मूषकवाहन, एकदंत, मोदकाधारी असा गणपती, वरदविनायक, त्रिशूलधारी, लंबोदर, पाशांकुशधार असा गणांचा नायक, बुद्धी प्रदायक, सर्वांना सुखी आनंदी ठेवणारा शंकर पार्वतीचा सुपुत्र गणपती याची सुंदर रूपे रेखाटली. या नंतर मल्लरी हि शुद्ध नर्तनाची रचना सदार करण्यात आली. हे सादरीकरण सौन्दर्यपूर्ण रेषा व ताल बद्ध पदन्यासांनी युक्त होते. संगीताची थोरवी सांगणारी पुढील रचना संगीत शब्दम. हि रचना व त्याची सौंरचना नाविन्यपूर्ण वाटली. आपल्या आजूबाजूला असलेल्या सत् शक्तीची जाणीव करून देणारी मूर्त म्हणू कि अमूर्त तू या रचनेने सादरीकरणाचा उचांक गाठला. रसिकांकडून आस्वाद्याचे दान मागून, गुरूंच्या कृपेने कलाभ्यास उन्नत होवो व उपस्थितांचे मंगळ चिंतून नृत्याभिवाद ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पल्लवी यांच्या सहज व श्रवणीय निवेदनाने रसिकांना प्रस्तुत रचनांचा अधिक आनंद घेता आला. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई