शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, इमारतीचीही सुरक्षा वाºयावर, कोपरीतील ठाणेकरवाडीतील तीन दुचाकींना आग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 04:42 IST

ठाण्यात पुन्हा एकदा दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आग लावण्याचा प्रकार गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुचाकींना आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नसल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.

ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कोपरीतील ठाणेकरवाडी परिसरातील तीन दुचाकींना आग लावण्याचा प्रकार गुरुवारी पहाटे २.३० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुचाकींना आग कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नसल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.शांतीनगरमधील गोमती बंगल्यासमोरील ‘दत्तविजय सोसायटी’ या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या तीन दुचाकी गुरुवारी पहाटे अज्ञाताने पेटवून दिल्या. एका फायर इंजीनच्या मदतीने ठाणे पालिकेच्या कोपरी केंद्रावरील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.येथील योगेश कार्ले यांची एक, तर जे. सुब्रह्मण्यम यांच्या दोन दुचाकी जळाल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ‘दत्तविजय सोसायटी’ला सुरक्षारक्षक नसून दोन सीसीटीव्हींपैकी एकच चालू आहे. त्यामुळे इमारतीची सुरक्षाही वाºयावर आहे. परंतु, त्यात घटना कैद झाली नसल्याचे कोपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. कोर्डे यांनी सांगितले. उपनिरीक्षक सुजाता जगताप अधिक तपास करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी ठाण्यातील विविध ठिकाणी दुचाकी जाळल्याच्या घटना घडल्या होत्या.दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना...खोपट परिसरातील सिद्धेश्वर तलाव भागात शिवसेना पदाधिकाºयाच्या दुचाकीसह चार ते पाच वाहनांना तिथल्याच काही तरुणांनी आग लावल्याचा प्रकार घडला होता.त्याआधी ठाण्याच्या सॅटिसखालील सात ते आठ दुचाकींना एका माथेफिरूने दारूच्या नशेत आग लावली. तर, लोकमान्यनगर येथेही अशाच प्रकारे काही रिक्षांना आग लावण्यात आली होती. सिद्धेश्वर तलाव, सॅटीस या ठिकाणच्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली. परंतु, लोकमान्यनगरच्या आरोपींचा शोध लागलेला नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा