शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तीन आठवडे उलटूनही ठाण्यातून पसार झालेल्या कैद्याची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:29 IST

कसून शोध घेण्याचे आदेश : आयुक्तांनी घेतला आढावा

- जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळून पळालेला न्यायालयीन बंदी नरेश छाब्रिया (२९, रा. साईनाथ कॉलनी, उल्हासनगर) हा आरोपी पसार झाल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करूनही तो अद्याप ठाणे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला शोधण्यासाठी बुधवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीदरम्यान पुन्हा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे विशेष मकोका न्यायालयात १६ जुलै २०१९ रोजी ४.३० वाजण्याच्या सुमारास सुनावणीसाठी नरेशला नेण्यात आले होते. या सुनावणीनंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडे त्याच्यासह अन्य चार आरोपींना नेले जात असतानाच कैदी पार्टीवरील मुख्यालयाचे जमादार शिवराम चव्हाण यांच्या हाताला झटका देऊन तो पसार झाला होता. त्यावेळी कारागृहासमोर झालेल्या वाहतूककोंडीचाच फायदा घेऊन तो एका दुचाकीस्वारामागे बसून निसटला होता. त्यावेळी इतर कैदीही असल्यामुळे चव्हाण यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना त्याचा पाठलाग करता आला नाही. तर, चव्हाण यांनी पाठलाग करूनही तो त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटला होता. त्याच्या शोधासाठी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे शोध पथक (डीबी), उल्हासनगरचे हिललाइन, भिवंडीचे शांतीनगर तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट १ ठाणे शहर, युनिट २ भिवंडी आणि युनिट ३ कल्याण अशा सहा पथकांची निर्मिती केली आहे. सहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह त्यांची पथके त्याच्या मागावर आहेत. चोरी, दरोडा तसेच मकोकांतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. एका गुन्ह्यात वारंवार समन्स बजावूनही तो हजर होत नव्हता. २६ जून २०१९ रोजी अटक वॉरंट काढल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. नरेश छाब्रियाच्या घटनेपाठोपाठ कल्याणमधूनही एक आरोपी पसार झाला होता. त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. उल्हासनगर येथील कुटुंबीयांकडेही नरेश परतलेला नाही. त्याची अनेक ठिकाणी चौकशी करूनही तो हाती न लागल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात गेल्या महिनाभरातील गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त फणसळकर यांनी बुधवारी घेतला. गेल्या महिनाभरात ज्या पोलिसांनी चांगली कामगिरी केली, त्यांचा प्रमाणपत्र देऊन आयुक्तांनी सन्मान केला. आगामी बकरी ईद, स्वातंत्र्य दिन, नारळी पौर्णिमा आणि गणेशोत्सव या सणांसाठी चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

टॅग्स :thaneठाणेjailतुरुंग