शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वागळे इस्टेट भागात रस्ता खचून तीन वाहनांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:09 IST

वागळे इस्टेट भागात फुटपाथच्या बाजूचा रस्ता खचून त्यात तीन वाहने तब्बल १५ फुट खाली गेल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही.

ठळक मुद्देवाहने १५ फुट गेली खालीसुदैवाने जिवीतहानी टळली

ठाणे - स्टेशन परिसरात होर्डीग्ज पडल्याची आणि त्यानंतर नितिन कंपनी येथे सिग्नल पडल्याची घटना ताजी असतांना शुक्रवारी रात्री वागळे इस्टेट परिसरातील रामचंद्र नगर भागात फुटपाथ च्या शेजारी असलेला रस्त्याचाच काही भाग चक्क खचल्याची घटना घडली आहे. या दुर्गघटनेत त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दोन चार चाकी वाहन आणि एक रिक्षा अडकली होती. ठाणे महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल यांच्या मदतीने ही वाहने पहाटे पाच च्या सुमारास बाहेर काढण्यात आली आहेत. सुदैवाने या तिसऱ्या घटनेतही कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.               रामचंद्र नगर क्रमांक ३, कामगार रुग्णालयाच्या नजीक असलेल्या राजमुद्रा सोसायटीच्या समोरील रस्त्याच्या बाजूचा काही भाग शुक्र वारी रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक खचला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सदर दुर्घटनेत याठिकाणी उभ्या असलेल्या दोन चार चाकी गाड्या आणि एक रिक्षा अशी तीनही वाहने थेट १५ फूट खाली गेले. ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. ही माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली टीडीआरफ च्या पथकाने आणि अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने रात्रभर परिश्रम घेऊन जेसीबीच्या साहाय्याने शनिवारी पहाटे पाच वाजता ही तिन्ही वाहने बाहेर काढली. दरम्यान या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील एकच बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली आहे. दरम्यान हा रस्ता खचला कसा याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथे पडलेले खड्डे योग्य रितीने बुजविण्यात आले नव्हते. येथे जे खोदकाम करण्यात आले होते. ते बुजविण्याच्या कामात योग्य अशी सुरक्षेची काळजी घेण्यात आली नसल्याने ही दुर्घटना घडली असावी असे बोलले जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAccidentअपघात