शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहरातून तीन दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST

ठाणे : ठाण्यातील विविध तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी नौपाडा, ...

ठाणे : ठाण्यातील विविध तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी नौपाडा, चितळसर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पाचपाखाडी भागातील रहिवासी विशाल खोपटकर यांनी आपली दुचाकी याच भागातील दुकानासमोर उभी करून ठेवली होती. ती अनोळखी चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना १८ मे रात्री ८ ते १९ मे सकाळी १० च्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजर्न शहा यांनी आपल्या घराजवळ दुचाकी उभी केली होती. त्यांचीही दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहेत. तर तिसरी घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तेथील आझादनगरमध्ये राहणारे फिर्यादी यांनी आपली दुचाकी हायलॅण्ड, ढोकाळी येथे उभी केली होती. त्यांचीही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या तिन्ही गुन्ह्यांचा पोलीस तपास करीत आहेत.

------

रिक्षा चोरीला

ठाणे : ओवळा सिग्नलजवळील रस्त्याच्या कडेला उभी केलेली रिक्षा अनोळखी चोराने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पवई येथे राहणारे फिर्यादी यांनी ही रिक्षा उभी करून ठेवली होती. ही घटना १८ मेच्या रात्री ८.४५ ते १९ मेच्या सकाळी ६ च्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

------