ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्येप्रकरणी शहर पोलिसांनी विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे व सुधाकर चव्हाण चारही नगरसेवकांविरूद्ध मंगळवारी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात तीन हजार ४९ पानांचे आरोपपत्र दाखल केले. अटकेतील चार नगरसेवक वगळता यात परमार यांच्या डायरीतील नोदींच्या आधारे अन्य राजकीय नेत्यांचा समावेश केलेला नाही.आरोपपत्र काय?आत्महत्येपूवीची चिठ्ठी, तिचा फॉरेन्सिक अहवाल, सूरज परमार यांनी त्यांचे प्रकल्प का रखडले आहेत याबाबत त्यांच्या ग्राहकांना पाठवलेल्या ई-मेलची कॉपी, चार नगरसेवकांचे परमार प्रकरणाशी संबंधीत चर्चा आदी मुद्द्यांचा समावेश आहे.
परमारप्रकरणी तीन हजार पानांचे आरोपपत्र
By admin | Updated: February 3, 2016 03:52 IST