शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली एक महिला मयत,तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:27 AM

भिवंडी : तालूक्यातील खाडीपार -रसुलाबाग भागात एकता चौकजवळ तीन मजली इमारत रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेजारील चाळीवर कोसळली असुन या दुर्घटनेत एक महिला मयत असून एका मुलीसह दोन महिला असे एकुण तीनजण जखमी झाले असून त्यांना शहरातील इंदिरांगांधी उपजिल्हा रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.इमारतीच्या ढिगाऱ्याखाली याकूब कुटूंबातील तीन जण अडकल्याची ...

ठळक मुद्देखाडीपार -रसुलाबाग भागात तीन मजली इमारत रात्री शेजारील चाळीवर कोसळलीग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांनी आज दुपारी मिटींग घेऊन इमारतीतील सर्वांना बाहेर काढलेग्रामपंचायतीने अनाधिकृत व धोकादायक जाहिर केली होती

भिवंडी : तालूक्यातील खाडीपार -रसुलाबाग भागात एकता चौकजवळ तीन मजली इमारत रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेजारील चाळीवर कोसळली असुन या दुर्घटनेत एक महिला मयत असून एका मुलीसह दोन महिला असे एकुण तीनजण जखमी झाले असून त्यांना शहरातील इंदिरांगांधी उपजिल्हा रूग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.इमारतीच्या ढिगाऱ्याखाली याकूब कुटूंबातील तीन जण अडकल्याची माहिती परिसरांतील लोकांनी दिली असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.खैरूनिसा इस्माईल सय्यद(२५)या महिलेचा ढिगाºयाखाली मृत्यु झाला असून कुमारी शेख मरीयम जरार(९),साफीयाबी युसुफ सरदार(६०)मेहरूनिस्सा शेख (४०)या तीनजणी इमारतीच्या दुर्घटनेत जखमी झाल्या आहेत. जखमींवर इंदिरागांधी रूग्णालयांत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर इमारत ही सात वर्षापुर्वी फौजान सुसे या बिल्डरने बांधली असून ती गेल्या महिन्यात अनाधिकृत व धोकादायक इमारत म्हणून खोणी ग्रामपंचायतीने घोषित केली आहे.ही इमारत पाडण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व एमएमआरडीए यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.परंतू संबधित विभागाने कोणतीही कारवाई केली नाही,अशी माहिती खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच अल्ताफ शेख याने घटनास्थळी दिली.आज दुपारी या इमारतीची भिंत कोसळल्याने दुपारी खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच अल्ताफ व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून घेतलेल्या मिटींगनंतर या इमारतीतील सर्व कुटूंबांना बाहेर काढले.त्यामुळे प्राणहानी टळली आहे. परंतू याकुब कुटूंब इमारती बाहेर न पडल्याने त्यांच्या घरातील तीन सदस्य ढिगाºयाखाली अडकल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली. आज रात्री नऊ वाजता सदर इमारतीचा पुढील भाग शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळीतील लहान मुलीसह तीन महिला जखमी झाल्या आहेत.इमारतीचा काही भाग शौचालयांवर कोसळल्याने त्यामधून दोन पुरूषांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. दुर्घटनेनंतर पालिकेचे आपत्त्कालिन व्यवस्थापन व अग्निशामकदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ढिगाºयाबाहेर काढून उपचारासाठी पाठविले. दरम्यान तहसिलदार शशिकांत गायकवाड यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलास पाचारण केले असून ते रात्री ११-३० वाजता घटनास्थळी पोहोचून त्यांनी मदतकार्य सुरू केले. दुर्घटनेनंतर परिसरांतील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

टॅग्स :BhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना