शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उल्हासनगरच्या ‘मणप्पुरम्’ लुटीतील तीन चोरटे जेरबंद

By admin | Updated: January 11, 2017 04:56 IST

उल्हासनगर येथील मणप्पुरम गोल्ड लोन या दागिने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या संस्थेच्या वास्तूला भगदाड पाडून सुमारे ७ कोटी २२ लाख ४० हजार ३०५ रुपयांचे

ठाणे : उल्हासनगर येथील मणप्पुरम गोल्ड लोन या दागिने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या संस्थेच्या वास्तूला भगदाड पाडून सुमारे ७ कोटी २२ लाख ४० हजार ३०५ रुपयांचे २८.६८६ किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या २० जणांच्या टोळीपैकी मुख्य सूत्रधारासह तिघांना थेट नवी मुंबईतून ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७७ लाख २७ हजार ५६२ रुपयांचे सोन्याचे दागिने  हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली.उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मणप्पुरम गोल्ड लोन या संस्थेत २४ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते २६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा. च्या दरम्यान दोन दिवसांची सुटी असल्याची संधी साधून कार्यालयाच्या पाठीमागील भिंत फोडून ग्राहकांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांसह रोकड लुटली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या ठाणे आणि उल्हासनगर युनिटकडे सोपविला होता. साहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने टोळीचा सूत्रधार कमरुद्दीन शेख (२८, तुर्भे, नवी मुंबई) आणि मनोज साऊद (३५, गणेशनगर, दिवा, ठाणे) यांना ४ जानेवारी रोजी अटक केली. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांचा आणखी एक साथीदार मुस्तफा उर्फ अख्तर समशेर (४४, रा. समस्तीपूर, झारखंड) यालाही तुर्भे भागातून उल्हासनगर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे, निरीक्षक अजय कांबळे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख, उपनिरीक्षक उदय साळवी आदींच्या पथकाने सापळा रचून अटक केली. कमरुद्दीन हा या टोळीचा म्होरक्या असून त्यानेच या चोरीची आखणी केल्याचे तपासात उघड झाले. मुस्तफा आणि मनोज यांच्याकडून सुमारे दोन किलो ८६२.०६ ग्रॅम वजनाचे ७७ लाख २७ हजार ५६२ किमतीचे सोने हस्तगत केले आहे. यातील कमरुद्दीन आणि मनोजला १२ जानेवारीपर्यंत तर मुस्तफाला १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)