शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेला कचरामुक्त शहरांच्या यादीत थ्री स्टार रॅकींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 18:40 IST

कचरा व्यवस्थापनात केलेल्या बदलामुंळे ठाणे महापालिकेचा कचरा मुक्त शहरांच्या यादीत तिसरे रॅकींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापन, कचरा हाताळणी, कर्मशिअल कचºयावर प्रक्रिया करणे, नागरीकांच्या आलेल्या तक्रारींचे ७५ टक्यापर्यंत निवारण यामुळे पालिकेचा क्रमांक टु स्टारवरुन थ्री स्टारवर आला आहे.

ठाणे : कचरामुक्त शहरांच्या यादीत नवी मुंबईला फाईव्ह स्टॉर रॅकींग मिळाले असतांना ठाणे महापालिकेचा क्रमांकही मागील वेळेपेक्षा सुधारल्याचे दिसून आले आहे. मागील वेळेस टु स्टार असलेल्या ठाणे महापालिकेला यंदा थ्री स्टार रेटींग मिळाले आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये केलेल्या सुधारणेमुळे, तक्रारी सोडविण्यामध्ये आणि कचऱ्याची योग्य रितीने हाताळणी केल्यामुळे पालिकेचा हा क्रमांक सुधारल्याची माहिती आता समोर आली आहे.                    केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दैनंदिन सफाई, सिंगल प्लास्टिक यूज़ वरील बंदी, नालेसफाई, वेस्ट मैनेजमेंट यावर केंद्र सरकारचा भर होता. त्यानुसार ठाणे महापालिकेचा क्रमांकही यंदा सुधारल्याचे दिसून आले आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ७५० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. डम्पींग ग्रांऊड वगळता पालिकेचे कचरा व्यवस्थापन योग्य रितीने हाताळल्याचे दिसून आले आहे. शहरात निर्माण होणारा कचरा रोजच्या रोज उचलला जात आहे. त्याचे वर्गीकरणही केले जात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तसेच त्याची हाताळणीही योग्य पध्दतीने केली जात आहे. याशिवाय घंटागाड्यांवर जीपीएस सीस्टम बसविण्यात आल्याने कचºयाची नित्यनियमाने उचलण्याची व्यवस्था केली जात आहे. कचरा कलेक्शन, कचरा निवारणाचे स्टेज आदी प्रकारात पालिकेने आघाडी घेतली आहे. कचरा व्यवस्थापनाची योग्य अशी साखळी तयार केली आहे. तसेच आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचे प्रमाणही वाढले आहे. तर यातील काही प्रमुख कारणे पालिकेने सांगितली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कचरा कलेक्शनच्या सीसस्टमध्ये बदल झाला, ई व्हॅल्युएशनचे प्रमाण हे ८० टक्के होते, ते आता ९६ टक्यांवर आले आहे, सोसायटीमधली कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ५० टक्यांवरुन ८० टक्यांवर आला आहे, कर्मशीअल एरीयात साफसफाईचे ही दिवसातून वेळा केली गेली आहे, त्याचाही परिणाम झाल्याचे दिसून आले. शहराच्या विविध भागात प्लास्टीकचे लीटर बीन्स बसविण्यात आले आहेत, त्याचा फायदा झाला. बल्क वेस्ट जनरेटर मध्ये कमर्शिअलवाल्यांचा कचºयावर १०० टक्के प्रक्रिया केली जाते, सेवा शुल्क वसुल करण्यातही आघाडी, जुने डम्पींग ग्राऊंड बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली, तसेच नागरीकांचा कौलही केंद्राच्या कमिटीने घेतला होता, त्यातही महापालिका ७५ टक्क्यांवर आली आहे. तसेच नागरीकांच्या तक्रारी सोडविण्याचे प्रमाणही ७५ टक्के आल्याने या सर्वांमध्ये घेतलेल्या आघाडीमुळेच पालिकेला थ्री स्टार रेटींग मिळाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका