शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ठाण्यातील तीन रस्ते सकाळच्या फेरफटक्यासाठी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 20:22 IST

ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देसकाळी ५ ते ७ या वेळेत वाहनांना प्रवेश बंदीठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणेकरांचे आरोग्य सदृढ रहावे, यासाठी ठाणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात शहरांतील तीन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी घेतला आहे. या अनोख्या योजनेमुळे ठाणेकरांना ‘मॉर्निग वॉक’ करण्यास प्रोत्साहन मिळेल, सुरक्षितपणे व्यायामाची संधी मिळेल आणि सकाळच्या वेळेमध्ये होणाºया सोनसाखळी चोऱ्यांवरही नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हे अभियान हाती घेतले आहे. परंतू, त्यातून केवळ वाहन चालकांसाठीच नव्हे, तर पादचाºयांच्या सुरिक्षततेसाठीही प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यानुसार ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही योजना मूर्त स्वरूपात आणली जात आहे. केवळ प्रभात फेरीसाठी काही रस्ते आरक्षित असावे, यासाठी सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला आग्रही होते. त्यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील तीन हात नाका (उपायुक्त कार्यालय) ते धर्मवीर नाका सेवा रस्ता , उपवन तलावाजवळील अँम्फी थिएटर ते गावंड बाग (गणपती विसर्जनाचा कृत्रिम तलाव), पोखरण रोड क्र मांक दोन येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर नाटयगृह चौक या तीन रस्त्यांची निवड या विशेष योजनेसाठी केली आहे. पहाटे ५ ते ७ या वेळेमध्ये या तिन्ही रस्त्यांवर दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. या रस्त्यांवर केवळ प्रभात फेरी योगा किंवा अन्य प्रकारांचे व्यायाम करणारे तसेच, सायकलिंग करणाºयांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती उपायुक्त पाटील यांनी दिली.प्रभात फेरी करणाºया महिलांच्या गळयातील सोनसाखळया चोरीचे प्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. मात्र, वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरून फेरफटका मारणेही महिलांना असुरक्षित वाटते. परंतू, आता या तीन रस्त्यांवर वाहनांना प्रवेश मिळणार नसल्याने महिलांसह प्रत्येक पादचाºयांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच, चालतांना रस्त्यांवर अपघात होण्याचा धोकाही नसेल. या उपक्र मामुळे सकाळी प्रभात फेरी मारणाºयांच्या संख्येत निश्चित भर पडेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे.* स्मार्ट आणि आरोग्यदायी शहरासाठीसकाळचा फेरफटका मारण्याचे अनेक फायदे आहेत. चालण्याने श्वासाची गती, हृदयाची गती तसेच रक्त प्रवाहावर चांगला परिणाम होतो. पचनशक्ती वाढून भूक वाढण्यास मदत होते. शरीर तंदुरु स्त राहते. त्यामुळे प्रभात फेरीला प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरण आहे. स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट ठाणे शहर आरोग्यदायीसुद्धा असावे, हाच या योजनेचा उद्देश आहे.बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस