शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तीन खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ते कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 05:53 IST

आठ लाखांची वसुली : मागितला फ्लॅट

डोंबिवली : अनधिकृत बांधकामांविरोधात माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून केडीएमसी मुख्यालयासमोर उपोषणास बसलेला माहिती अधिकार कार्यकर्ता कल्पेश जोशी याच्यासह त्याचा भाऊ विनोद जोशी आणि आठ लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाऱ्या वसंत जोशी या तिघांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने बुधवारी अटक केली. कल्याण न्यायालयाने या तिघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात वार्तापत्राच्या माध्यमातून माहिती अधिकार कायद्याचा कसा दुरुपयोग केला जातो, याबाबतचे वास्तव मांडले होते. ठामपामध्ये यापूर्वी खंडणीविरोधी पथकाने कारवाई केली आहे. त्याच धर्तीवर आता कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही अशा प्रकारे गुन्हे दाखल होऊ लागले आहेत.

पूर्वेतील दत्तनगरमध्ये राहणाºया एका व्यावसायिकाचे नेमाडे गल्ली परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम त्यांचा भागीदार पाहत असतो. या बांधकामाविरोधात माहिती अधिकार कायद्यान्वये कल्पेश याने पालिकेकडे अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्याच्या मोबदल्यात कल्पेशने बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. खंडणीची रक्कम न दिल्याने गळ्यात पाटी अडकवून कल्पेशने या बांधकामाविरोधात केडीएमसी मुख्यालयासमोर अनोखे आंदोलनही केले होते. तसेच सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे आणि बॅनरद्वारे बदनामीची धमकी कल्पेश त्या व्यावसायिकाला देत होता. आतापर्यंत कल्पेशने त्याच्याकडून चार लाख ७० हजार रुपये रोख घेतले. आता त्या बांधकाम व्यावसायिकाकडे एक रूम अथवा ३० लाखांची मागणी कल्पेशने केली. दररोजच्या त्रासाला कंटाळून या व्यावसायिकाने ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.अधिक तपास सुरूबांधकाम व्यावसायिकाकडून आठ लाख स्वीकारणाºया वसंत जोशीसह कल्पेश आणि विनोद या तिघांना खंडणीविरोधी पथकाने बुधवारी रात्री ९ च्या सुमारास अटक केली. अधिक तपास खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आर.एम. कदम करत आहेत.

टॅग्स :Arrestअटकthaneठाणे