शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहापुरातील प्रकरणात आणखी तीन शिक्षकांना अटक; शाळेची मान्यता रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 06:15 IST

गुरुवारी सर्वांना न्यायालयात हजर केले होते, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शहापूर - शहापुरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मासिक पाळीच्या संदर्भात विद्यार्थिनींसोबत झालेल्या गैरवर्तन प्रकरणी गुरुवारी आणखी तीन शिक्षकांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मुख्याध्यापिका  व सफाई महिला कामगारांना बुधवारीच अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. अन्य तिघांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी सर्वांना न्यायालयात हजर केले होते, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, जोपर्यंत संस्थाचालक खुलासा करीत नाहीत तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी  घेतला आहे. संस्थाचालकांनी मुख्याध्यापिकेला बडतर्फ करण्याची कार्यवाही केली आहे. अधिकाऱ्यांच्या तपासणीत शाळेत तक्रार निवारण समिती नसणे, सखी सावित्री समितीची केवळ नोंद असणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचा संस्थेचा निर्णयजोपर्यंत संस्थाचालक आमच्यासमोर येऊन झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला होता. त्यामुळे गुरुवारी एकही विद्यार्थी शाळेत आला नाही. संस्थाचालकांनीही गुरुवारी, शुक्रवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी पालक व शिक्षकांची शाळेमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीस जिल्हा दक्षता समिती, पोलिस तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी हजर राहणार आहेत.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या!राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गुरुवारी संबंधित शाळेला भेट दिली. तसेच पोलिस ठाण्यात जाऊन तपासाची माहिती घेतली. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तपास जलदगतीने पूर्ण करीत दोषारोपपत्र दाखल करावे, असेही त्यांनी सांगितले.