शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 22:21 IST

सर्व बाजू पडताळल्यानंतर ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सोमवारी तिन्ही आरोपींना प्रत्येक कलमाखाली प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावासाची तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्दे ठाणे न्यायालयाचा निर्णय कळवा पोलिसांनी केला तपास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका १५ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाºया मंगल चौधरी (२१, रा. कळवा, ठाणे), वरुण उपाध्याय (१९, रा. वाघोबानगर, ठाणे) आणि भूपेंद्र विश्वकर्मा (२०, रा. वाघोबानगर) या तिघा आरोपींना ठाणे न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.कळवा, वाघोबानगर येथे राहणाºया या पिडित मुलीला त्याच परिसरातील आरोपी मंगल चौधरी आणि वरुण उपाध्याय यांनी गुंगीचे औषध लावलेल्या रुमालाचा वास दिला होता. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिला पळवून नेऊन तिचा विनयभंग करुन तिच्यावर भूपेंद्र तसेच अन्य एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना १४ एप्रिल २०१४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे, पळवून नेणे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम आदी कलमांखाली पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आरोपी मंगल आणि वरुण यांना १५ एप्रिल २०१४ रोजी तर भूपेंद्र याला १४ जून तर अन्य एका अल्पवयीन आरोपीला १९ एप्रिल २०१४ रोजी अटक केली होती. यामध्ये पाचवा आरोपी मात्र फरार झाला होता. पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर यांनी या प्रकरणाचा यशस्वीपणे तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून जमादार ज्ञानेश्वर ताजणे यांनी तर सरकारी वकील म्हणून उज्वला मोहळकर यांनी काम पाहिले. सर्व बाजू पडताळल्यानंतर ठाण्याचे न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांनी सोमवारी तिन्ही आरोपींना प्रत्येक कलमाखाली प्रत्येकी पाच वर्षे सश्रम कारावासाची तसेच १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यातील चौथा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याची भिवंडी येथील बाल न्यायालयात सुनावणी होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयRapeबलात्कार