शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील इमारत दुर्घटनेतील जखमींसाठी तीन लाखांची मदत

By जितेंद्र कालेकर | Updated: May 17, 2023 23:35 IST

नौपाडा, भास्कर कॉलनीतील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना साेमवारी घडली.

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नौपाडा, भास्कर कॉलनीतील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना साेमवारी घडली. या दुर्घटनेत विजया मोहन सुर्यवंशी, त्यांची दोन मुले प्रथमेश व अथर्व सूर्यवंशी हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमीची विचारपूस करीत उपचारामध्ये कोणतीही हयगय होणार नाही, अशा सूचना देउन या कुटुंबाला तीन लाख रुपयांची मदत दिली. ही मदत शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी विजया यांची मुलगी िप्रयंका सूर्यवंशी यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केली.

सूर्यवंशी कुटुंबाला उपचारासाठी मुख्यमंत्री िशंदे यांनी तीन लाखांची मदत देवून आर्थिक सहकार्य केले. शिवसेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेवून ही मदत त्यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील, शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नाक्ती तसेच अमर टॉवर सोसायटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अमर टॉवर दुर्घटनेचे वृत्त समजताच शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नाक्ती यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य सुरू केले. तसेच सूर्यवंशी कुटुंबातील जखमींना नौपाड्यातील पराडकर रुग्णालय व कौशल्य रुग्णालय येथे दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. विजया सूर्यवंशी यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडले आहे. म्हस्के यांनी या दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. ही इमारत ही २५ वर्षे जुनी असून या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करुन घेण्याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना सूचित केले. तसेच सदर इमारतीचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीने रहिवाशांना दिले.

अमर टॉवर इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर अनेक नेत्यांनी याठिकाणी जावून पाहणी केली. मात्र सर्वात प्रथम शिवसेनेने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. व या दुर्घटनेत जखमी झालेल्या सूर्यवंशी कुटुंबातील व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ संपर्क साधून जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांमार्फत केलेली तीन लाखांची मदत विजया सुर्यवंशी यांची मुलगी प्रियांका यांच्याकडे सुपुर्द केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे त्यांनी आभार व्यक्त केले. -नरेश म्हस्के, समन्वयक, शिवसेना महाराष्ट्र प्रदेश

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे