शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:31 IST

कसारा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उंबरमाळी गावालगत मुंबई-नाशिक महामार्गावरील हॉटेल अमनसमोर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कंटेनरला शुक्रवारी एका गाडीने मागून धडक दिली.

कसारा : कसारा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उंबरमाळी गावालगत मुंबई-नाशिक महामार्गावरील हॉटेल अमनसमोर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कंटेनरला शुक्रवारी एका गाडीने मागून धडक दिली. या अपघातात तिघे जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नालासोपारा येथील आचोळे गावातून हेमंत चौधरी शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांना घेऊन शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले. ११.३०च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरून जात असताना उंबरमाळी येथील वळणावर हॉटेल अमनसमोर उभ्या असलेल्या कंटेनरवर चौधरी यांची गाडी धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, गाडीतील एअरबॅग्ज ओपन होऊन संपूर्ण गाडीच कंटेनरच्या खाली गेली. त्यात गाडीचालकासह अन्य दोघे जागीच ठार झाले, तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. रमेश खंडू नाईक (५५), मनोज चौधरी (२८) आणि हेमंत चौधरी (४४) (सर्व राहणार नालासोपारा, आचोळेगाव) अशी मृतांची नावे आहेत.गाडीत मागच्या सीटवर बसलेले धनश्री हेमंत चौधरी (२०), धीरज हेमंत चौधरी (२६) आणि मधुमती हेमंत चौधरी (३८) ही आई आणि मुले गंभीर जखमी झाले असून त्यांना ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कुटुंबप्रमुख हेमंत चौधरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप त्यांना दिलेली नाही.या भीषण अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कोल्हे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले. रस्त्यावरच उभ्या असलेल्या या कंटेनरचालक-मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांनी केली आहे.>उंबरमाळी गावालगत मुंबई-नाशिक महामार्गावरील हॉटेल अमनसमोर बेकायदेशीर उभ्या असलेल्या कंटेनरला शुक्रवारी एका गाडीने मागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, गाडीतील एअरबॅग्ज ओपन होऊन संपूर्ण गाडीच कंटेनरच्या खाली गेली.रुग्णवाहिका नसल्याने उपचारास विलंबअपघातस्थळी तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कसारा पोलिसांच्या गाडीने तिघांना शहापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित तिघांपैकी दोघे जागीच गेले होते, तर एक जिवंत होता. परंतु, १०८ आणि हायवे मदत (पिक इन्फ्रा) वेळीच न पोहोचल्याने त्याला प्राण गमवावा लागला.

टॅग्स :Accidentअपघात