शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे तीन अधिकारी ‘गायब’? प्रशासनाकडे माहिती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 01:07 IST

सरकारकडे पाठवला अहवाल

कल्याण : राज्य सरकारकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार आणि महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालय आणि शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त नितीन नार्वेकर हे तीन अधिकारी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाला काहीच न सांगता ‘गायब’ झाले आहेत. अन्य कोणत्या ठिकाणी त्यांची बदली झाली का, ते तेथे रुजू झाले का, याची माहिती केडीएमसी प्रशासनाकडे नाही, तसेच त्यांनीही प्रशासनाला याबाबत कळवलेले नाही. त्यामुळे महापालिकेने या तिघांचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे.

२०१६ मध्ये राज्य सरकारकडून तोरसकर महापालिकेत आले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार त्यांच्याकडे होता. महापालिकेत आल्यापासून त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे काम योग्य प्रकारे केले नाही, अशी टीका नगरसेवकांनी वारंवार केली. २०१८ मध्ये त्यांची गडचिरोली येथे बदली झाली होती. मात्र, तेथील पदभार घेण्याऐवजी त्यांनी महापालिकेत राहणे पसंत केले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी निरीक्षक म्हणून भूमिका बजावली. मात्र, तेव्हापासून ते महापालिकेत आलेले नाहीत. ते रजेवरही गेलेले नाहीत. मग ते गेले कुठे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे. आपण कुठे जात आहोत, याबाबतही त्यांनी आयुक्त तसेच महापालिका प्रशासनाला काहीच कळवलेले नाही. ते प्रतिनियुक्तीवरील अधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात कारवाईचा अधिकार महापालिका आयुक्तांना नाही. त्यामुळे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांनी सरकारला तसा अहवाल पाठविला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने तोरसकर यांच्याकडील पदभार अमित पंडित यांच्याकडे दिला आहे.महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त पगार हे देखील एप्रिलपासून महापालिकेत आलेले नाहीत. मुलगा आजारी असल्याने आपण गैरहजर राहत असल्याचे त्यांनी सुरुवातीला कळवले होते. मात्र, त्यानंतर ते कामावर आलेले नाहीत. त्यांची कुठे बदली झाली का, त्यांनी तेथे पदभार घेतला का, याबाबत काहीच माहिती महापालिका प्रशासनाला त्यांनी कळविलेलीनाही.

जुलै २०१८ पासून महापालिका आयुक्त कार्यालय आणि शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त नार्वेकर हेही गायब आहेत. रजेचे कारण देत ते वर्षभरापासून कामावर आलेच नाहीत. त्यांनी देखील पुढे काय झाले, याची माहिती महापालिकेस कळविलेली नाही. राज्य सरकारला त्यांच्याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून कारवाई अपेक्षिततोरसकर, पगार व नार्वेकर हे तिन्ही अधिकारी प्रतिनियुक्तीवरील असल्याने त्यांच्याविरोधातील कारवाई राज्य सरकारकडून होणे अपेक्षित आहे. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना शहरांच्या समस्यांविषयी काही देणे घेणे नसते. त्यामुळे ते योग्य प्रकारे काम करत नाहीत. कामाचे अपयश लपविण्यासाठी ते काढता पाय घेतात, अशी टीका नगरसेवकांकडून नेहमीच होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका