शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरी बॉय सांगून जबरी चोरी करणारे त्रिकुट जेरबंद; ठाणे गुन्हे युनिट १ ची कामगिरी

By अजित मांडके | Updated: November 12, 2022 18:11 IST

नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास नौपाडा आणि ठाणे गुन्हे युनीट १ यांच्या मार्फत समांतर सुरू होता.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून घरात शिरकाव करत ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे केअरटेकर यांना लुबाडणाऱ्या ऋतिक रणजीत नेगी, शुभम बाळासाहेब फाफळे आणि मयूर रामदास महाले या तिघांना अटक करण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिटला यश आले आहे तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आला आहेत. अटकेतील चोरटे हे २० ते २२ वर्षीय असून दोघे ठाण्यातील, एक अहमदनगर येथील रहिवासी आहे. ठाण्यातील दुकली नवीमुंबई तर एका अहमदनगर येथून अटक करण्यात आली आहे. 

नौपाडा परिसरात डिलिव्हरी बॉय असल्याची बतावणी करत, ज्येष्ठ नागरिक त्यांचे केअर टेकर यांना हेरत, तसेच त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून त्यांचे हात पाय बांधत. तसेच त्यांच्याकडे घरातील लॉकरची चावी मागणी करत. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अशाप्रकारे घडलेल्या गुन्ह्यात त्यांनी केअर टेकर याच्या खिशातील रोकड जबरदस्तीने चोरली. तसेच दरवाज्या बाहेर कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने ते ड्रेनेज पाईपच्या साह्याने इमारतीखाली उतरून पळून गेले होते. 

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास नौपाडा आणि ठाणे गुन्हे युनीट १ यांच्या मार्फत समांतर सुरू होता. याचदरम्यान संशयित असलेले ऋतिक आणि शुभम हे दोघे नवीमुंबई परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि योगेश काकड यांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली त्यांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर याला अटक केली.  त्यांना नौपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे