शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांनंतर जूगावातील ५८ ग्रामस्थ परतले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:19 IST

उद्ध्वस्त संसार पाहून डोळ्यांत पाणी, तहसीलदारांकडून पाहणी

टिटवाळा : मुसळधार पावसामुळे खडवली येथील भातसा नदीला पूर येऊ न रविवारी जूगावातील ५८ ग्रामस्थ अडकले होते. गावाला अक्षरश: पाण्याचा वेढा पडल्यामुळे हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. वर्षभराचे साठवलेले धान्य, दुभत्या म्हशी, शेळ्या आणि भातशेती पाण्यात वाहून गेल्याचे पाहून मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. पुरातून जीव वाचला, पण बुडालेला संसार पुन्हा कसा उभा करायचा, याची चिंता त्यांच्या चेहऱ्यांवर उमटली होती. मंगळवारी सायंकाळी तीन दिवसांनंतर हे ग्रामस्थ स्वगृही परतले आहे. या गावात कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे पाहणी करत आहेत.कल्याण तालुक्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला. शेकडो घरे पुराच्या पाण्यात होती. खडवली येथे तर बिकट परिस्थिती निर्माण होऊ न जूगावात २० महिला, २५ पुरु ष आणि १३ लहान मुले असे ५८ लोक अडकले होते. त्यांची एनडीआरएफ आणि वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली. सुटका केलेल्या या ग्रामस्थांची बाळकुम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने संजय भोईर यांनी केली. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर तीन दिवसांनी हे ग्रामस्थ खडवली येथील जूगावात शासकीय वाहनाने परतले आहेत.पुरात कैलास पालवी, रवींद्र सवार, विष्णू पालवी, रमेश जाधव, गणेश जाधव, शांताराम जाधव, संतोष गाडगे, राजू सवार, अनंता मुकणे, सुवर्णा पालवी, हाली जाधव, गुली सवार, फसी मुकणे आदी ५८ ग्रामस्थ अडकले होते. बुधवारी तहसीलदार आकडे यांनी पथकासह गावात पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे केले. तसेच लोकांशी चर्चा करून त्यांची व्यथा जाणून घेतल्या. पुरामध्ये वर्षभराचे साठवून ठेवलेले धान्य, ४० शेळ्या, भातशेती तसेच १० दुभत्या म्हशी वाहून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.आजही तो दिवस आठवला की, अंगाला काटा उभा राहतो. तो अत्यंत कठीण काळ होता. काही तास अक्षरश: मृत्यू आमच्यासमोर उभा होता. शासकीय मदत वेळेत पोहोचली म्हणूनच आमचा जीव वाचला. मात्र, आमची जनावरे, शेती वाहून गेल्याने आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत.- कैलास पालवीआमच्या गावाला चारही बाजूंनी पुराने वेढले होते. यातून आम्ही वाचू, याची आशाच सोडली होती. आमचे नशीब मोठे म्हणूनच मदत वेळेत मिळाली. - रवींद्र सवारपुरातून बाहेर काढून आम्हाला सुरक्षितस्थळी हलवले; पण आमचे लक्ष घराकडे लागले होते. आपल्या जनावरांचे, शेती आणि घरांचे काय झाले असेल, ही चिंता सतत मन पोखरत होती. मंगळवारी सायंकाळी घरी आम्ही परतलो, तेव्हा पुरात आमच्या आयुष्यभराची कमाई वाहून गेल्याचे पाहायला मिळाले. - विष्णू पालवी