शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्यास क्रिएशन्सचा तीन दिवसांचा पुस्तक आदान प्रदान महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 16:09 IST

व्यास क्रिएशन्सचा तीन दिवसांचा पुस्तक आदान प्रदान महोत्सव ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांचा पुस्तक आदान प्रदान महोत्सवज्येष्ठांसाठी घरपोच सेवासाहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

ठाणे : वाचन हा उत्तम संस्कार असून त्याचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी सलग दुसर्‍या वर्षी व्यास क्रिएशन्सने‘पुस्तक आदान प्रदान’ महोत्सवाचे सहयोग मंदिर, पहिला मजला, ठाणे येथे 26 मे ते 28 मे या कालावधीत आयोजन केले आहे. ‘आपण वाचलेले आणि संग्रही पुस्तक दान करा आणि तुम्हाला आवडेल ते पुस्तक घेऊन जा’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात पुस्तक आदान प्रदानाखेरीज भरगच्च साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. 

     शनिवार दि. 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजता जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे यांंच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी 6 वाजता व्यास क्रिएशन्स् प्रकाशित आणि दीपा जोशी लिखित ‘हस्तमुद्रा : तुमचं आरोग्य तुमच्या हातात’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांच्या हस्ते होईल. रविवार दि. 27 मे, सकाळी 10 ते 1 या वेळेत अभिवाचन, कविता वाचन, कथाकथन आणि नाट्यकथा याचे आयोजन केले आहे. यासाठी वय आणि भाषेचे बंधन नाही. नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी समन्वयक रामदास खरे - 9869014319 यांच्याशी संपर्क साधावा. संध्याकाळी 6 वाजता स्व. अरुण दाते यांच्या भावगीतांवर आधारित ‘शुक्रतारा’ हा संगीतमय कार्यक्रम कनिरा आर्ट सादर करतील. सोमवार दि. 28 मे रोजी सकाळी 10 वाजता ‘बालमैफील’ हा नाट्यछटा, कवितासादरीकरणाचा कार्यक्रम खास छोट्या दोस्तांसाठी आयोजित केला आहे. 5 ते 15 वयोगटातील बालकलाकार यात सहभागी होतील. नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी समन्वयक श्रीरंग खटावकर - 7039410869 यांच्याशी संपर्क साधावा. सायंकाळी 5.30 वाजता स्वा. सावरकर जयंतीनिमित्त स्वरसंवादिनी प्रस्तुत आणि पुष्पा लेले संचलित ‘गीत सावरकर’ हा वि. दा. सावरकर यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार असून ह.भ.प. बाबूराव कानडे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी व्यास क्रिएशन्स् प्रकाशित आणि श्री. वा. नेर्लेकर  लिखित धगधगते यज्ञकुंड ः वि. दा. सावरकर  या पुस्तकाच्या मराठी 8व्या आणि 9 व्या, हिंदी दुसर्‍या आणि इंग्रजी दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल.हा संपूर्ण महोत्सव पूर्णतः विनामूल्य असून सर्व वयोगटातील रसिक या महोत्सवात सहभागी होऊ शकतात. पुस्तकांच्या आदान-प्रदानासाठी भाषेचे बंधन नाही. आदान-प्रदान महोत्सवात वाचकांनी दान केलेली आणि उरलेली पुस्तके ठाणे आणि आसपासच्या परिसरातील तब्ब्ल 20 वृद्धाश्रमांना भेटीस्वरूपात देण्यात येणार आहेत. साहित्यप्रेमींनी आपल्या संग्रही असलेली दुर्मीळ, नवी जुनी वाचनीय पुस्तके घेऊन या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड यांनी केले आहे. 

ज्येष्ठांसाठी घरपोच सेवा

पुस्तक आदान प्रदान सोहळा सर्वांसाठी विनामूल्य आहे, मात्र इच्छा असूनही ज्येष्ठांना पुस्तके घेऊन येणे शक्य नसते. यासाठी यावर्षी आयोजकातर्फे खास ज्येष्ठांसाठी घरपोच सेवा देण्यात येणार आहे. यासाठी 022-25447038 या क्रमांकावर संपर्क साधावा.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई