शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील रंगायतनची खिडकी पडल्याने तीन कलाकार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:59 IST

रंगायतनच्या स्ट्रक्चरल आॅडीटची मागणी

ठळक मुद्देसन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृहशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक उभे होतेस्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी नाट्यरसिकांची मागणी

भिवंडी : शहरातील एकमेव सांस्कृतीक केंद्र म्हणून प्रसिध्द असलेल्या स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनच्या इमारतीची खिडकी खाली पडल्याने तीन कलाकार जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.मात्र या घटनेची तक्रार संबधितांनी न केल्याने पालिकेच्या अधिकाºयांनी देखील ही घटना गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे शहरातील संतप्त नाट्यरसिकांकडून या रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.शहरातील स्वामी विवेकानंद शाळेचे शनिवारी सायंकाळी वार्षिक स्नेह संमेलन होते. या संमेलनात येणाºया मान्यवरांच्या स्वागतासाठी कल्याणचे बॅण्ड पथक तेथे उभे केले होते.त्याचवेळी नाट्यगृहाच्या दुसºया मजल्यावरील मोडकळीस आलेली खिडकी अचानकपणे लोखंडी ग्रिलसहीत खाली बॅण्ड पथकातील तीन कलाकारांच्या अंगावर पडली. त्यामुळे बॅण्ड पथकातील विलास चौव्हान(२४), वृश्चिक धुमाळ (२४) व हर्ष (२९)हे तीघेजण जखमी झाले.त्यांना पाठीवर मुका मार लागला असुन खिडकीच्या तुटलेल्या काचा त्यांच्या शरिरात घुसल्या.त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला टाके घालावे लागल्याची माहिती आॅर्बीट हॉस्पिटलचे डॉ. जयेश शेळके यांनी दिली. त्यांना ताबडतोब उपचार करून घरी पाठवून दिल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.शहरातील नागरिकांना मराठी नाटके व इतर मनोरंजनाचे कार्यक्र म पाहण्यासाठी ठाणे, मुंबई येथील नाट्यगृहात जावे लागत असल्याने शहरातील नाट्यप्रेमींनी शहरात नाट्यगृह बांधावे,अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार पालिकेने सन १९८८ साली कोट्यावधी रूपये खर्च करून १३०० आसनांचे अद्यावत नाट्यगृह बांधले आहे.परंतू पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठाकरे रंगायतनची दुर्दशा झाली आहे.अशा स्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक संमेलन आणि काही आंबट शौकीनांसाठी होत असलेल्या नृत्यांच्या कार्यक्रमावर हे रंगायतन तग धरून आहे. रंगायतनचे पावित्र्य राखण्यासाठी व त्यामधील सोयीसवलती करण्याकडे शिवसैनिकांनी गेली २५ वर्षे धृतराष्ट्राची भूमीका घेतल्याने रंगायतनच्या इमारतीची देखील दैना झाली आहे.आंतील रंगमंच ढासळलेल्या स्थितीत आहे. मंचावरील पडदे(कल्टन)फाटलेले आहेत.खुर्च्या मोडलेल्या आहेत.ठेकेदाराने लाखो रूपये घेऊन पुरविलेला माईक-स्पिकर वर्षभरांत निकाली निघाला आहे.तर नाट्यगृहाच्या खिडक्या व तावदाने तुटलेल्या अवस्थेत आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी नाट्यगृहासाठी ३५ लाख रूपये बांधकाम विभागाकडून तर २० लाख रूपयांची तरतुद विद्युत विभागाकडून केली जाते. मात्र हा खर्च कागदावर केला जातो,असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सध्या नाट्यगृहाची अवस्था भकास व भयाण झाली आहे. त्यामुळे शहर व परिसरांतील नाट्यरसिकांमध्ये नाराजी पसरली असुन पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन नाट्यरसिकांसाठी स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनचे स्ट्रक्चरल आॅडीट करून ते दुरूस्त करावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात