शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘एमडीएमए’सह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या त्रिकुटास ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मिथिलीन डायआॅक्सी मेथा फिटामाईन अर्थात ‘एमडीएमए’ सह अमली पदार्थांची तस्करी करणाºया अयुब अन्सारी (२१, ...

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई सात लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मिथिलीन डायआॅक्सी मेथा फिटामाईन अर्थात ‘एमडीएमए’ सह अमली पदार्थांची तस्करी करणाºया अयुब अन्सारी (२१, रा. भिवंडी, ठाणे) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख ७८ हजार ८१० रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत केला आहे.कोपरीतील आनंदनगर येथील बंद जकात नाक्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर एक व्यक्ती अमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. तिच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, प्रशांत पवार, भूषण शिंदे, जमादार बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे, शरद तावडे, देविदास जाधव, पोलीस हवालदार जगदीश न्हावळदे, राजेंद्र गायकवाड, अजय फराटे, दिलीप शिंदे, शिवाजी रायसिंग, शशीकांत नागपुरे, विजयकुमार गोºहे, राजेश क्षत्रीय, मनोज पवार, अजित शिंदे, सागर सुरळकर, महिला पोलीस नाईक कल्पना तावरे, सुजाता शेलार आणि चालक यश यादव आदींच्या पथकाने ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास कोपरीतील मुंंबई ते ठाण्याच्या दिशेने येणाºया रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी अयुब अन्सारी याला या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये दोन लाख २० हजारांची ५५ ग्रॅम वजनाची मेफे ड्रॉन (एमडी) पावडर, मोबाईल आणि काही रोकड असा दोन लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. त्याच्याच चौकशीतून हुसेन राजानी (३२, रा. अंधेरी) आणि नबी शेख (३०, रा. चेंबूर) या अन्य त्याच्या दोन साथीदारांना १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एमडीएमए, एसकेटॅसी पिल्स, एलएसडी डॉट, गांजा आणि चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या टोळीकडून एकूण सात लाख ७८ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.* एकाचवेळी विविध प्रकारचे अमली पदार्थ एकाच टोळीकडून मिळण्याची ही ठाण्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या तिघांनाही १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ