शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी शिवसेना शाखाप्रमुखावरील गोळीबार प्रकरणी तिघे ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 22:33 IST

ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना 3 जानेवारी रोजी घडली होती. या घटने प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विकी उर्फ सोनू प्रकाश म्हात्रे (२५) धंदा- डंपर ड्रायव्हर, रा. कालवार, तर प्रथम किशोर भोईर (२०) रा. डोंबीवली आणि वैभव विजय भोकरे (२५) रा. काल्हेर ता. भिवंडी, अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकीय वर्चस्वाच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी दिली. २ जानेवारी रोजी म्हात्रे हे पत्नीसह घरासमोरील परिसरात आपल्या भावाने घेतली गाडी बघत होते. तेव्हाच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. मात्र, म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत गोळी चुकवली आणि पत्नीलाही सुरक्षित ठिकाणी नेले. या घटने प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक या घटनेचा समांतर तपास करीत होते. गुन्हे शाखा भिवंडी युनिटच्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत या घटनेतील आरोपींबाबत माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.अटकेतल्या आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच पक्षाचे वर्चस्व राहावे या कारणातून विकी उर्फ सोनू प्रकाश म्हात्रे आणि त्याचे साथीदार यांनी दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार केल्याचे पोलीस तपासातून समोर आल्याची माहिती  येनपुरे यांनी दिली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना