शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरटा निघाला सराईत, तीन चो-यांची कबुली दिली पण तक्रारदारच मिळेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 21:17 IST

चरईतील एका महिला वकिलाकडे लॅपटॉपची चोरी करतांना रंगेहाथ पकडलेल्या अफरोज शेख या चोरट्याने आणखी तीन ते चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्यातील रेल्वेतील मोबाईल चोरीमध्ये त्याला अटकही झाली होती.

ठाणे: चरईतील एका महिला वकिलाकडे लॅपटॉपची चोरी करतांना रंगेहाथ पकडलेल्या अफरोज शेख या चोरट्याने आणखी तीन ते चार गुन्ह्यांची कबुली दिली. त्यातील रेल्वेतील मोबाईल चोरीमध्ये त्याला अटकही झाली होती. अन्य तीन गुन्ह्यांची त्याने कबुली दिली असली तरी संबंधितांची तक्रार किंवा तक्रारदारही न मिळाल्याने पोलिसांची पंचाईत झाली आहे.चरईतील अ‍ॅड. स्वाती प्रधान चिटणीस यांच्या काबाडअळीतील ‘आनंदवन’ या इमारतीच्या कार्यालयाच्या दरवाजाचे लॅच तोडून त्याने लॅपटॉप चोरला. या सोसायटीच्या काही दक्ष नागरिकांनी त्याला ८ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ वा. च्या सुमारास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिरीष यादव यांच्या पथकाने त्याला बोलते केल्यानंतर त्याने आणखी चार चो-यांची कबूली दिली. त्यातील रेल्वेतील एका मोबाईल चोरीमध्ये त्याला सहा महिन्यांपूर्वीच अटक झाली होती. या प्रकरणात त्याची तीन महिन्यांपूर्वीच जामीनावर सुटकाही झाली आहे. याशिवाय, राबोडी, ठाणेनगर आणि नौपाडा या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील परिसरातही तीन चो-या केल्याचा त्याने दावा केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार नौपाड्यात एका घरात तो चोरीसाठी शिरला त्यावेळी तिथे घरातील मंडळी निद्रावस्थेत पाहून तो चोरीसाठी धजावला नाही. तर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र असलेल्या एका सोसायटीच्या घरातून त्याने सोन्याच्या रिंगा लांबविल्या. पण याचा तक्रारदार किंवा अन्य माहिती उपलब्ध झाली नाही. तिस-या चोरीसाठी जिल्हा रुग्णालयासमोरील वस्तीत शिरल्याचे तो सांगतो. पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. तिथेही तक्रारदार किंवा चोरीचा ऐवज मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या जबाबातील तथ्यता आता पडताळली जात असून त्याच्या शुभम या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कळवा झोपडपट्टी परिसरात शुभम आणि त्याची ओळख झाल्यानंतर दोघे मिळून वेगवेगळ्या ठिकाणी चो-या करीत असत. चोरीतील माल ते वाटून घेत असत. नौपाड्यात दोघांपैकी एक पकडला गेला असून त्याच्या दुस-या साथीदाराचा मात्र शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :Crimeगुन्हा