शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे यांना धमकीचे पत्र हा खोडसाळपणा? ठाणे पोलिसांची गडचिरोलीतही चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 07:23 IST

गेल्या काही महिन्यांत पालकमंत्र्यांनी गडचिरोली येथे विकासकामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले.

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागड एरिया कमिटीच्या नावाने धमकीचे पत्र देण्याचा प्रकार कोणीतरी खोडसाळपणातून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. ठाणे पोलिसांचे एक पथक गडचिरोलीत यासंदर्भात चौकशीसाठी गेले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू राहणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.  

पालकमंत्री शिंदे यांना भामरागड एरिया कमिटीच्या नावाने तीन आठवड्यांपूर्वी पत्र आले आहे. यामध्ये ‘तुम्ही गडचिरोलीचा खूप विकास करीत आहात. पण आम्हाला मोठी समस्या निर्माण करीत आहात. पोलिसांच्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. याचा आम्ही नक्कीच बदला घेऊ,’ असा इशारा देण्यात आला होता. ठाण्यातील लुईसवाडीतील नंदनवन या निवासस्थानी आलेल्या पत्राची ठाणे आणि गडचिरोली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाकडून केला जात आहे. या पत्रावर दक्षिण मुंबईच्या पोस्ट कार्यालयाचा शिक्का आहे. मात्र, जिथून ते पाठविण्यात आले, त्या पोस्ट कार्यालयाचा शिक्का अस्पष्ट आहे. पत्रातील मजकूर मुंबई, ठाण्यातील भाषेप्रमाणे आहे. यामध्ये नक्षलवादी भाषेचा पुसटही उल्लेख नाही. शिवाय, नक्षलवाद्यांच्या धमकीची भाषा आणि पत्रातील भाषा यात बराच फरक आहे. त्यामुळे प्राथमिक तपासात हा कोणीतरी खोडसाळपणा केला असावा, किंवा मुंबई, ठाण्यातूनच कोणीतरी पालकमंत्री शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला असावा, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

गेल्या काही महिन्यांत पालकमंत्र्यांनी गडचिरोली येथे विकासकामांचा धडाका लावला. त्याचप्रमाणे अनेक नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळेच गडचिरोली आणि आसपासच्या परिसरातील नक्षलवादी नाराज असल्याचा सूर उमटला होता. पत्रातून धमकी कोणी आणि का दिली, याचा सर्वच बाजूंनी तपास सुरू असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.या धमकी प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर येथेही चौकशीसाठी गेले होते. याबाबत अद्याप चौकशी सुरू आहे. अजून यात कोणालाही ताब्यात घेतले नाही. अंतिम निष्कर्षापर्यंत अजूनही तपास आलेला नाही. - लक्ष्मीकांत पाटील, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे