शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या वादातून महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 21:30 IST

जागेच्या वादातून सोनी कोमगल (५३) या महिलेवर रिव्हाल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कळव्यातील सुधीर शर्मा, अपक्ष नगरसेवक जितेंद्र पाटील आणि मंगेश पाटील या तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती कायद्यांतर्गत शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देनगरसेवक जितेंद्र पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध तक्रारविटाव्यातील घटना अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गतही दाखल झाला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: विटावा येथील जागेच्या वादातून सोनी कोमगल (५३) या महिलेवर रिव्हाल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी कळव्यातील सुधीर शर्मा, अपक्ष नगरसेवक जितेंद्र पाटील आणि मंगेश पाटील या तिघांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती कायद्यांतर्गत शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अन्य एका अशाच प्रकरणात राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांच्याही विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.कोमगल यांनी कळवा पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार कळवा परिसरातील राजू म्हात्रे यांची जागा त्यांनी विकसित करण्यासाठी घेतली आहे. या जागेवर घरांचे बांधकाम केल्यानंतर त्यांच्या विक्रीतून ६० टक्के रक्कम त्या स्वत: घेऊन उर्वरित ४० टक्के रक्कम जागा मालक म्हात्रे यांना देण्याचे ठरले आहे. याशिवाय, विटावा येथेही त्यांची १२ गुंठे जागा असून या जागेवर अनधिकृतपणे कब्जा मिळविण्यासाठी स्थानिक रहिवाशी सुधीर शर्मा, मंगेश पाटील आणि नगरसेवक जितेंद्र पाटील हे वारंवार धमकवित असल्याचा आरोपही कोमगल यांनी केला आहे. हा प्रकार २०१४ ते ३० आॅगस्ट २०१९ या कालावधीत सुरु आहे. ‘तू विटावा परिसरात रुम बांधू नकोस, तू बाहेरुन आलेली भाडेकरु आहेस. भाडेकरुसारखी रहा, असे म्हणून तिला आणि तिच्या दोन वेळा मारहाण करण्यात आली. शर्मा याने तर त्याचे रिव्हॉल्व्हर आपल्या डोक्याला लावून सतत ठार मारण्याची धमकी देत जाती वाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही कोमगल यांनी केला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात नगरसेवक पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यांतर्गत २५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक महेश साळवी यांनीही घर बांधून दिले नाही. तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार लक्ष्मीकुमार या महिलेने कळवा पोलीस ठाण्यात एक आठवडयापूर्वी केली. याप्रकरणी साळवी यांच्याविरुद्धही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtmcठाणे महापालिका