शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात जावयाने केली सासूला मारहाण, मेहुणीलाही दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 01:35 IST

मेहुणीला ठार मारण्याची धमकी देऊन घरात शिरलेल्या हर्ष केणी या जावयाने सासू ज्योती लडकत (४९, गोखले रोड, नौपाडा, ठाणे) यांना जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली.

ठाणे : मेहुणीला ठार मारण्याची धमकी देऊन घरात शिरलेल्या हर्ष केणी या जावयाने सासू ज्योती लडकत (४९, गोखले रोड, नौपाडा, ठाणे) यांना जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी जावई केणी याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.गोखले रोड येथे राहणाऱ्या ज्योती यांच्या पतीचे २००७ मध्ये निधन झाले आहे. त्यांच्या पूनम आणि सोनम या दोन मुलींचा विवाह झाला आहे. तर, प्रियल ही तिसरी मुलगी त्यांच्यासमवेत असते. सोनम हिचा हर्ष केणी याच्यासमवेत २००७ मध्ये प्रेमविवाह झाला आहे. मुलगी सोनम हिच्याशी वारंवार भांडणे करून तिला ते त्रास देत असल्याने जावई आणि सासू ज्योती यांचेही एकमेकांशी पटत नव्हते. याच कारणामुळे ते आपल्या सासूरवाडीलाही जात नव्हते.१९ फेब्रुवारी २०२० रोजी हर्ष याने मेहुणी प्रियल हिला फोनवरून पत्नी सोनमबाबतची विचारपूस केली. मात्र, सोनमच्या वैयक्तिक बाबींबाबत तिच्याकडेच विचारपूस करावी, असा सल्ला प्रियलने त्याला दिला. याचाच राग आल्याने तुला बघून घेतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ करून त्याने फोन बंद केला. त्यानंतर, ३ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ज्योती लडकत या एकट्याच घरी असताना हर्षने त्यांचे नौपाड्यातील घर गाठले. वारंवार दरवाजा वाजवूनही लवकर दरवाजा उघडला न गेल्याने हर्ष याने दरवाजावर लाथा मारल्या. अखेर, ज्योती यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्याने घरात शिरकाव करून मेहुणी प्रियल हिची विचारपूस करून तिचा शोध घेतला. त्याने दोघींनाही शिवीगाळ केली. त्यावर शिवीगाळ न करण्याबाबत सासूने त्याला सुनावल्यानंतर त्याने रागाच्या भरात ज्योती यांना मारहाण करून त्यांना ढकलून दिले. तुम्हाला दोघींना सोडणार नाही, ठार मारून टाकीन, अशी धमकी देऊन तो तिथून निघून गेला.>चौकशी सुरुज्योती लडकत यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ५ मार्च रोजी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लडकत यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी सुरू असून, यासंदर्भात आरोपींचा जबाब नोंदवणार असल्याचे नौपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.