शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच मुख्यमंत्र्यांना धमकी - प्रविण दरेकर

By जितेंद्र कालेकर | Updated: October 2, 2022 21:44 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची  हिंदुत्ववादी विचारधारा घेतल्यानंतर हिंदू विरोधी प्रवृत्ती डोक वर काढत आहेत.

ठाणे: राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर देशविरोधी प्रवृत्ती ठेचून काढण्याचे काम सुरु आहे. त्याने भयभीत होऊनच मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी रविवारी ठाण्यात केला. 

ठाणे शहरातील दानशूर व्यक्तींकडून ४०० क्षय रुग्णांना सलग सहा महिने दरमहा पोषक आहार दिला जाणार आहे. प्रधानमंत्री टीबीमुक्त  भारत अभियानाद्वारे ठाणे शहरातून क्षय रोगाचे निर्मूलन करण्यासाठी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला. निक्षय मित्र योजनेंतर्गत ठाण्यातील दानशूर व्यक्तींनी पहिल्या टप्यात ४०० रुग्णांना पोषक आहार देण्याचे ठरविले. या कार्यक्रमाचे ठाणे  महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात दरेकर यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना दरेकर यांनी हा आरोप केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची  हिंदुत्ववादी विचारधारा घेतल्यानंतर हिंदू विरोधी प्रवृत्ती डोक वर काढत आहेत. मात्र  राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहे. ते या सर्व गोष्टी शोधून काढतील. या  प्रकारणाचा  पूर्ण पदार्पाश  करून फडणवीस ते मुळासकट ठेचून काढतील, असेही दरेकर म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत चला विचारांचं सोनं लुटूया, अशी घोषणा  दिली जायची.आता अशी घोषणा दिली जाते  का?असा सवाल ही दरेकर यांनी दसरा मेळाव्याबद्दलच्या प्रश्ना उत्त्तर देतांना उपस्थितीत केला. आता उद्धव ठाकरे यांचा विचार हा सोनिया गांधी आणि शरद पवार यांचा विचार झाला आहे. त्यांचा विचार हिंदुत्ववादी विरोधी  झाल्याची टिकाही त्यांनी केली. वारसा हा  विचारांचा असतो. केवळ जन्माला आलं म्हणजे वारसा येतं नसतो. तो विचारांचा वारसा एकनाथ शिंदे यांना शिवसेनिकांनी आणि जनतेने दिला. परिणामी हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं हें बीकेसीला लुटलं जाईल.तो हिंदुत्ववादी मेळावा असेल.तर  शिवाजी पार्क येथे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा संयुक्त मेळावा असेल असं दरेकर म्हणाले. 

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस