शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठी पाट्यां’साठी मनसैनिकांची ‘दम’बाजी!, राज ठाकरे यांच्या सभेचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 06:08 IST

ठाणे : शनिवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा संपल्यावर मनसैनिकांनी घरी जाताना काही दुकानांत जाऊन इंग्रजी पाट्यांऐवजी मराठी पाट्या तातडीने लावण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या.

ठाणे : शनिवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा संपल्यावर मनसैनिकांनी घरी जाताना काही दुकानांत जाऊन इंग्रजी पाट्यांऐवजी मराठी पाट्या तातडीने लावण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या. या वेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या मनसैनिकांना घरी जाण्यास सांगितल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी.एस. स्वामी यांनी ‘लोकमत’ला दिली.गडकरी रंगायतनसमोरील रस्त्यावर राज यांनी जाहीर सभा घेऊन त्यात फेरीवाल्यांसह अनेक मुद्द्यांना हात घातला. या वेळी त्यांनी मनसेच्या आंदोलनामुळे मराठी पाट्या दिसू लागल्याची आठवण करून दिली. तसेच, यापुढे महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीचा वापर होत नसल्यास त्याविरोधात आंदोलन करण्याचा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला. याचा परिणाम शनिवारी रात्री लगेच दिसून आला. सभा संपताच मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या लावलेल्या ठाण्यातील काही दुकानांत जाऊन इंग्रजीत लिहिलेल्या पाट्या त्वरित बदला व त्याऐवजी मराठी पाट्या लावा, असा इशारावजा दमच दिला. परंतु, ही परिस्थिती लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. या वेळी ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत मला कल्पना नाही, अशी माहिती फक्त सोशल मीडियावर फिरत आहे. ठोस माहिती माझ्याकडे नाही. परंतु, ठाण्यात मराठी पाट्या प्रत्येक दुकानाबाहेर दिसाव्या, यासाठी मनसे लवकरच मोठी मोहीम हाती घेणार आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेthaneठाणे