शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

हजारो क्रि केटपटू घडवणारा अवलिया

By admin | Updated: December 25, 2015 02:19 IST

माझा जन्म ठाण्यात झाला. नंतर, आईबाबांनी मला कर्नाटकमधील कुमठा तालुक्यातील आमच्या गावी आजीआजोबांबरोबर राहण्यास पाठविले. तेव्हा मी २-३ वर्षांचा होतो.

क्रिकेटमधील कारकिर्दीला सुरुवात कशी झाली?माझा जन्म ठाण्यात झाला. नंतर, आईबाबांनी मला कर्नाटकमधील कुमठा तालुक्यातील आमच्या गावी आजीआजोबांबरोबर राहण्यास पाठविले. तेव्हा मी २-३ वर्षांचा होतो. माझे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. आईबाबा मात्र मुंबईतच राहत असल्याने मी १९६८ साली सातवीत असताना एक-दीड महिन्यासाठी मुंबईत आलो. त्या वेळी माझ्या आईवडिलांनी आमच्या हॉटेलमध्ये कपबशी विसळण्याचे काम नेमून दिले. ते करताना सेंट्रल मैदानात काही खासगी कंपनीतील कर्मचारी रोज क्रिकेट खेळताना दिसायचे. त्यांना खेळतांना पाहून मला नेहमी क्रि केट खेळायची इच्छा व्हायची. अनंत दामले तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रशिक्षण देत. मी त्यांच्या हालचाली पाहत असे. कंपन्यांतील स्पर्धा संपल्या की, मी आयोजकांकडून फुटका बॉल, मोडकी बॅट मागून घ्यायचो आणि त्यानंतर स्वत:च खेळातील बारकावे शोधतशोधत सराव करायचो. त्यातून हा प्रवास सुरू झाला.प्रशिक्षणाकडे कसे वळलात?मी स्वत: कधीच सिझन बॉलने खेळलो नाही. क्लबमधून माझ्या टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली. माझे बंधू सुरेश नाईक आणि सुधाकर नाईक हे चांगले क्रि केट खेळायचे. मात्र, योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे ते मागेच राहिले. त्यानंतर, क्रिकेटबद्दलच्या प्रेमामधून मी मॉर्र्निंंग क्रिकेट क्लबची स्थापना केली. ते साधारण १९७२ साल असेल. तो क्लब आजही अविरतपणे चालू आहे. कुठलीही संस्था सुरू करणे अगदी सोपे असते. पण, ती तितक्याच जोमाने सुरू ठेवणे, पुढे नेणे, ही कसोटी असते आणि कसोटी आम्ही सहजरीत्या जिंकू शकलो. मॉर्निंग क्लबमध्ये मात्र मी मुलांना सीझन बॉलवर प्रशिक्षण द्यायचो. सुलक्षण कुलकर्णी सात ते आठ वर्षांचा होता. त्या वेळी त्याचे भाऊही माझ्याकडे किक्रेट खेळायला यायचे. नंतर, हॉटेलमधील सर्वांना सोबत घेऊन पॅव्हेलियन नावाचा संघ तयार केला. हा संघ त्या वेळी खूप पॉवरफुल झाला, इतका की, ठाण्यातील खेळाडूंना ‘गावातील खेळाडू’ म्हणवून हिणवणारे मुंबईच्या क्रिकेट संघातील खेळाडू ठाण्यातील याच खेळाडूंना दचकू लागले. प्रशिक्षणावेळचे काही अनुभव?सेंट जॉन बाप्टिस्ट हायस्कूलमध्ये मी सलग २४ वर्षे प्रशिक्षण दिले. माझ्या काळात मी शाळेला ८५ वेळा विजेतेपद मिळवून दिले. शिवाय, तीन ते चार वेळा आम्ही सलग राज्यस्तरीय विजेतेपद पटक विले. सेंट जॉन स्कूलचे प्रशिक्षकपद सांभाळताना यश मिळवायचेच, ही जिद्द असायची. जेव्हा सेंट जॉन स्कूलचे सामने असायचे, तेव्हा तर मला सकाळपासूनच ताप भरायचा, अस्वस्थ वाटायचे. इतका मी त्या सामन्यांशी एकरूप झालेलो असायचो. त्या काळात माझ्या टीममधील २२ मुलांची राज्यस्तरीय क्रिकेट खेळण्यासाठी निवड झाली. अभिजित काळेही माझाच विद्यार्थी. माझी एकच इच्छा होती, एकच ध्येय होते, ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटला सुगीचे दिवस यावेत आणि आजही मी त्यासाठी प्रयत्नशील आहे. क्रिकेट जगवण्याची तुमची धडपड पाहून ठाणेकरांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला?ठाणेकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. क्रिकेट हा तसे पाहता श्रीमंती खेळ आहे. गोरगरिबांना गुणवत्ता असूनही आर्थिकदृष्ट्या क्रिकेट परवडत नाही. त्यामुळे मी गरीब पण गुणवत्ताधारक खेळाडूंमधील गुणवत्ता हेरून त्यांना प्रशिक्षण देण्याची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. ठाणेकर आजही खूप चांगला प्रतिसाद देतात. माझ्या जुन्या विद्यार्थ्यांची मुलेही माझ्याकडे शिकत आहेत. आदर्श प्रशिक्षक अशी तुमची ओळख आहे. ती कशी निर्माण झाली?मी घडवलेले नाणे खणखणीतच वाजायला हवे, या मताचा मी आहे. समजा, मी जर एखाद्या मुलाची शिफारस एफएमसीकडे केली तर त्यानेदेखील तेथे तसेच प्रदर्शन करणे गरजेचे आहे, असे मला वाटते. ठाणे शहरात स्टेडियम आहे. एकेकाळी येथे रणजी स्पर्धा होत असे. आता मात्र होत नाही. याला कोण जबाबदार आहे?दादोजी कोंडदेव स्टेडियम हे ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्टेडियम आहे आणि तेथे सांस्कृतिक कार्यक्रम होऊ नयेत, असे वाटते. शिवाय, येथील स्टेडियम अधिक उत्तम करण्यासाठी खेळाडूंनीही हातभार लावावा, असे वाटते. तसेच येथे लवकरच रणजी होणार असल्याचीही घोषणा केली आहे. ठाण्यामध्ये गल्लीगल्लीत कोच झाले आहेत. मात्र, त्यांना भुलू नये व भरमसाट पैसे खर्च करून मुलांना प्रशिक्षण देऊ नये. मुलांची आवड ओळखावी आणि मगच त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवावे.तरुणांना काय संदेश द्याल?सचिन असाच बनत नाही. त्याने मेहनत घेतली आहे. दिवसांत ५-५ मॅचेस तो खेळला आहे. आजकालच्या तरुणांमध्ये मेहनत करायची क्षमता नाही. तसेच पालकांचा दबावही मुलांवर खूप वाढला आहे. त्यांची आवड लक्षात न घेता त्यांना या खेळाकडे जबरदस्तीने पाठविले जाते ते त्यामुळेच. सध्या क्रिकेटचा बाजार चालू आहे. - शब्दांकन : भाग्यश्री प्रधान