शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ हरवलेल्या बहिणी सापडल्या , आई रागावल्याने सोडले होते घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:40 IST

घरी अठरा विश्व दारिद्रय असल्याने मुलींनी चांगले शिकावे, यासाठी त्यांना शाळेत जा, अभ्यास कर, असे वारंवार आई सांगून कधीतरी रागवायची, म्हणून अंबरनाथ येथील दोन सख्ख्या बहिणी दिवाळीच्या तोंडावर निघून गेल्या

पंकज रोडेकर ठाणे : घरी अठरा विश्व दारिद्रय असल्याने मुलींनी चांगले शिकावे, यासाठी त्यांना शाळेत जा, अभ्यास कर, असे वारंवार आई सांगून कधीतरी रागवायची, म्हणून अंबरनाथ येथील दोन सख्ख्या बहिणी दिवाळीच्या तोंडावर निघून गेल्या. अवघ्या १२ आणि ५ वर्षांच्या या चिमुरड्या मानखुर्द येथे सापडल्यानंतर ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटमुळे पुन्हा सुखरूप घरी परतल्या.अपहरण झालेली मुलेमुली तसेच बालगृहात दाखल असलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक यशवंत सोनावणे यांच्या पथक ातील पोलीस हवालदार प्रतिमा मनोरे आणि पोलीस नाईक रोहिणी नाईक या दोघी गेल्या होत्या. त्या वेळी तेथे १५ दिवसांपासून असलेल्या रूपाली (१२) आणि गौरी (५) या सख्ख्या बहिणी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्या बहिणींचा विश्वास संपादन करून त्यांना बोलते केले. सुरुवातीला त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर, आपण गरीब घरातील मुली असून आईवडील आणि मोठी बहीण असा आमचा परिवार असल्याचे सांगितले. तसेच वडील मजुरी आणि आई घरकाम करते. घरची गरिबी असल्याने आई आम्हाला शाळेत जा, अभ्यास कर, असे वारंवार सांगून कधीतरी रागावते. त्यामुळे आम्ही घरातून बाहेर पडलो. अंबरनाथ रेल्वे स्थानकात आल्यावर मुंबईकडे जाणाºया लोकलमध्ये बसल्यावर आम्हाला कल्याण येथे लहान मुलांसाठी काम करणाºया एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी पकडले. तेथून त्यांनी आम्हाला मानखुर्द येथे आणल्याचे सांगितले. त्याचबरोबर अंबरनाथ फॉरेस्टनाका, हनुमान मंदिर पाइपलाइन येथे राहत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यानुसार, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतल्यावर त्या तेथेच राहत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, शुक्रवारी रात्री त्या बहिणींना पालकांच्या स्वाधीन करण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन केल्याचे पोलीस म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे