शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या हद्दीतील ‘त्या’ इमारती होणार नियमित; शासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 00:35 IST

८५५ इमारतींना दिलासा; पालिका आयुक्तांना सर्वाधिकार

उल्हासनगर : राज्य शासनाच्या नोटिफिकेशननुसार धोकादायक आणि ८५५ बेकायदा इमारतींचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली. आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह नगरविकास सचिवाकडे साकडे घातल्यावर शासनाला २००६ चा अध्यादेश डोळ्यांसमोर ठेवून नवीन अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार सर्वाधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

उल्हासनगरात धोकादायक इमारती पडून अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्या महिन्यात १३ इमारती रिकाम्या केल्या असून शेकडो कुटुंबे बेघर झाली. त्यांच्यावर घर देता का घर, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महेक इमारतीतील रहिवाशांसह इतरांनी ३१ आॅगस्टपासून साखळी उपोषण सुरू केले. धोकादायक इमारतींबाबत दिलासा देणारा तोडगा काढण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, ज्योती कलानी, पंचम कलानी, शिवसेना-भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसह नगरविकास सचिव करीर यांच्याकडे साकडे घालून पाठपुरावा सुरू केला. अखेर, ९ सप्टेंबरला राज्य शासनाने अधिसूचना काढून धोकादायक व बेकायदा ८५५ इमारतींमधील शेकडो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

शहरातील ८५५ इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने २००६ मध्ये विशेष अध्यादेश शहरासाठी काढला होता. काही अटी व शर्तींवर दंडात्मक रक्कम आकारून बांधकामे नियमित करण्यास सुरुवात झाली. दंडात्मक रक्कम जास्त असल्याने २२ हजारांपेक्षा जास्त प्रस्ताव पालिकेकडे येऊ नही १०० बांधकामे नियमित झाली, तर काहींना डी फॉर्म देण्यात आले. १०० बांधकामे अधिकृत झाल्याने पालिकेला साडेसात कोटींचे उत्पन्न मिळाले. तज्ज्ञ समितीकडून प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर अंतिम सही जिल्हाधिकाऱ्यांची होत होती. जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार दिले होते; मात्र जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष न दिल्याने राज्य शासनाने नव्या अधिसूचनेद्वारे सर्वाधिकार पालिका आयुक्तांना दिल्याने धोकादायक व ८५५ इमारतींचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.‘निकषांची माहिती घेऊ ’धोकादायक व ८५५ इमारतींप्रकरणी राज्य शासनाने काढलेली अधिसूचना मिळाली असून त्यामध्ये अनेक सुधारणा आहेत. नवीन डीसी रूलनुसार चटईक्षेत्र, अटी-शर्ती व दंडात्मक रकमेत शिथिलता आदींबाबत नियम बाकी असून शहरातील धोकादायक व ८५५ बेकायदा इमारतींचा प्रश्न निकाली निघणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर