शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

जू गावातील ते ५८ लोक अखेर तीन दिवसानंतर पोहचले स्वगृही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 19:54 IST

शनिवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील खडवडी येथील भातसा नदीला पूर आल्याने रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

- उमेश जाधव

टिटवाळा - शनिवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील खडवडी येथील भातसा नदीला पूर आल्याने रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान येथील जू देखील गावाला पूराच्या पाण्याचा वेडावला बसला. यात येतील ५८ लोक या पोरात अडकली होती. त्यांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टर द्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. अखेर  तीन दिवसानंतर ते आपल्या येथील स्वगृही परतले आहेत. सध्या त्यांच्या गावात कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे यांचे पथक पहणी करण्यासाठी दाखल झाले आहे.

कल्याण तालुक्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागाला ही मोठ्या प्रमाणात पुराचा वेढा पडला होता. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेकडो घरे पूराच्या पाण्यात होती. अशीच परिस्थिती खडवली येथे निर्माण झाली होती. येथील जू गावात २० महिला, २५ पुरुष व १३  लहान मुलं असे ५८ लोक अडकले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांना एन डी आर एफ व वायुसेनेचे हेलिकॉप्टर यांनी रेस्क्यू करून ठाणे, बालकुम येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. तीन दिवस त्यांची या ठिकाणी रहाण्या- खाण्यापिण्याची व्यवस्था पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नगरसेवक संजय भोईर यांनी. तसेच यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. पूर ओसरल्ल्या नंतर  अखेर तीन दिवसानी मंगळवारी सायंकाळी त्यांना  शासकीय वाहानाने  खडवली येथील जू  या आपल्या स्वगृही सोडण्यात आले. 

या गावात पूरात कैलास पालवी, रवींद्र रामू सवार,  विष्णू पालवी रमेश परशुराम जाधव, गणेश परशुराम जाधव, शांताराम जाधव, संतोष गाडगे, राजू सवार, आनंता मुकणे, सुवर्णा पालवी, हाली जाधव, गुली सवार, फसी मुकणे इत्यादींसह ५८ लोक अडकली होती.

बुधवारी सदर ठिकाणची परिस्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी कल्याण तहसिलदार दिपक आकडे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जागेवर जाऊन घरांचे पंचनामे केले आहेत. तसेच बाधित लोकांशी चर्चा साधून त्यांच्या व्यथा ही जाणून घेतल्या.

या पूरात या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोलमजुरी करणाऱ्या या आदिवासी बांधवांनी वर्षभराचे धान्य घरात साठवून ठेवले होते ते ही या पूरात वाहून गेले आहे. तसेच त्यांच्या ४० शेळ्या  देखील वाहून  गेलेल्या आहेत. येथील शेतकरी विष्णू पालवे यांची भातशेती व दुध देणाऱ्या 10  म्हशी या पूरात वाहून गेल्या आहेत.

तो दिवस आठवला की अंगाला काटा मारतो. अतिशय कठीण परिस्थितीत आम्ही काही तास पूर सदृश्य परिस्थितीत अडकलो होतो.  दैव बलवत्तर होते म्हणून आम्हाला शासकीय मदत पोहोचली आणि आमचे जिव वाचले. परंतु आमची जानावरे व शेती आम्ही वाचू शकलो नाही.

- कैलास विष्णू पालवी

 

आम्ही खूप घाबरलो होतो. आमच्या गावाच्या चारी बाजुनी पाणी आणि आम्ही मध्ये आडकलो होतो. आम्ही  तर जगण्याची आशाच सोडली होती. परंतु शासकीय यंत्रणेमुळे आम्ही वाचलो. 

 - रवींद्र रामू सवार 

आम्हाला सुरक्षित स्थळी हलवले, परंतु आमचे सगळं लक्ष आमच्या घरी लागले होते. आपल्या जनावरांचे, शेती व घराचे काय होईल याच चिंतेत होतो. मंगळवारी सायंकाळी घरी आलो तर जागेवर काहीच नाही, सर्व काही पूराच्या पाण्यात वाहून गेले आहे. जो विचार येत होता तेच घडले.

- विष्णू पालवी

टॅग्स :thaneठाणे