शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

त्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार; एकनाथ शिंदे यांचे गावकऱ्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:22 IST

नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : मागील दोन वेळेस नवी मुंबईतून बाहेर पडलेल्या त्या १४ गावातील रहिवाशांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश व्हावा अशी ईच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार भंडार्ली तसेच आसपासच्या १४ गावांचा नवीमुंबईत समावेश करण्याबाबत नगरविकास खात्यामार्फत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शुक्रवारी नगरविकासमंत्री तथा ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

  भंडार्ली डम्पींगच्या मुद्यावरुन शुक्रवारी ठाणो महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथील गावकऱ्यांची बैठक लावण्यात आली होती. त्यावेळेस येथील रहिवाशांना नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा समावेश करावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. त्यानुसार शिंदे यांनी हे आश्वासन दिले आहे. येथील दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भंडार्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिरस मोरी आदी गावांचा यात समावेश आहे.

नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षापूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणा:या ठाणो, नवीमुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. वास्तविक पाहता नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळेस या गावांचा समावेश करण्यात आला होता. परंतु आम्ही महापालिका नको म्हणून येथील रहिवाशांनी विरोध करुन बाहेर पडले होते. त्यानंतर पुन्हा या गावांचा समावेश नवी मुंबईत करण्यात आला होता. दोन वेळा समावेशानंतरही येथील रहिवाशांनी नाके मुरडली होती. आता मात्र नवी मुंबई महापालिकेत समावेशासाठी याच रहिवाशांनी आग्रही भुमिका घेतली आहे. राज्य सरकाराने आखलेल्या नवी मुंबई विमानतळ अधिसुचित क्षेत्रत (नैना) या गावांचा समावेश केल्याने पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांचे पित्त खवळले होते. त्यानुसार आम्हाला महापालिकाच हवी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

शिळफाटा भागातून उजवीकडे वळल्यास कल्याण - तळोजा रस्त्यालगत ही गावे वसली आहेत. ठाणे महापालिका हद्दीत शीळ, डायघर अशा गावांना अगदीच खेटून ही गावे भौगोलिकदृष्टया नवी मुंबईशी संलग्न नसली तरी महापालिका स्थापनेच्या वेळेस त्यांचा महापालिकेत समावेश करण्यात आला होता. परंतु आता विकास कामे, समस्या सुटत नसल्याने या रहिवाशांनी पुन्हा महापालिकेत समावेशाची मागणी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीने हीच मागणी लावून धरली होती. त्यानंतर आता शुक्रवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे