शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा गंधार गौरव पुरस्कार महेश कोठारे यांना प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 08:08 IST

भव्यदिव्य बालनाट्य रंगभूमीवर आणण्याची इच्छा

ठाणे :  मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार मंगळवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला. बालनाट्य क्षेत्रात भव्य कलाकृती निर्माण करण्याची इच्छा आहे, त्यासाठी गंधार या संस्थेला सोबत घेतले जाईल, अशी इच्छा कोठारे यांनी व्यक्त केली. 

गंधारतर्फे मंगळवारी गंधार गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कोठारे यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ, आ. संजय केळकर, माजी खा. डॉ. संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक संजय वाघुले, अभिनेते, निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने, गंधारचे सर्वेसर्वा मंदार टिल्लू, सचिन मोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बालनाट्य हा कलाप्रकार लुप्त होत असल्याची खंत व्यक्त करत कोठारे म्हणाले की, रंगभूमीवर पहिले पाऊल सुधा करमरकर यांच्यामुळे ठेवू शकलो. 

मराठी चित्रपटसृष्टीला वैभव प्राप्तरवींद्र चव्हाण म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टी आम्ही आपल्यापासून पाहायला सुरुवात केली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपण मराठी चित्रपटसृष्टीला वैभव प्राप्त करून दिले. बालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम गंधार सारख्या संस्था करतात. गंधार अनेक कलाकार, व्यक्तिमत्त्व घडवत आहेत. ठाण्याबाहेरही संस्थेचे काम सुरू आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.

मचित्रपटसृष्टी कात टाकतेयदिग्दर्शक माने म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टी कात टाकत आहे. याचे कारण महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांनी ही चित्रपटसृष्टी जगवली.  हा पुरस्कार गौरवापेक्षा कृतज्ञता पुरस्कार आहे. मराठी चित्रपटसृष्टी खडतर काळातून जात असताना त्यांनी मराठी सिनेमा जिवंत ठेवला. यावेळी ज्ञानदा रामतीर्थकर, दत्तू मोरे, आदित्य दवणे, हेमंत सोनावणे, सुकन्या काळण यांना गंधार युवा पुरस्कार तर यावर्षी कला संस्कृती कलावेधक संस्था, कल्याण, रंगायतन महोत्सव यांना बालनाट्य संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालसाहित्य निर्मितीला मर्यादाॲड. शेलार म्हणाले की, त्या काळात महेश कोठारे आणि त्यांच्यासारख्या कलाकारांनी मराठी सिनेमा टिकवला नसता तर मराठी सिनेमांना आलेले आजचे दिवस पाहायला मिळाले नसते. नवीन काहीतरी करायचे आहे हा त्यांच्या मनाशी कायम सुरू असलेला संघर्ष आहे. बालनाट्य, बालसंगीत, बालसाहित्य ही चळवळ पुनर्स्थापित करण्याचे काम गंधार करत आहे. बालनाट्यासाठी नाट्यगृहात जागा नाही. बालसाहित्य निर्मितीच्या मर्यादा  आहेत. किंबहुना ते बाजारातच नाही आणि यातून व्यवसाय होईल याची शाश्वती नाही, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :Mahesh Kothareमहेश कोठारे