शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

'मराठीतील सुपरस्टार' सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 18, 2022 18:21 IST

मराठीतील सुपरस्टार सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 

ठाणे: मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी मंगळवारी गडकरी रंगायतन येथे दिली. पिळगांवकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर असल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. 

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे सातवे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पिळगावकर यांना देण्यात येत आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी गोखले आणि अभिनेत्री हेमांगी वेल्हणकर यांनी परीक्षण केले. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, बाळकृष्ण ओडेकर आदी उपस्थित होते.  कलेच्या उद्यानात मुक्त विहार करणारे कलानंदी व्यक्तिमत्त्व म्हणजे पिळगावकर त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्यात कलेचा आनंद घेण्याची वृत्ती आहे - विजय गोखले गंधार गौरव पुरस्कार 2022 नॉमिनेशन (नाटकांची नावे )नेपथ्य 1.गोष्टीची गोष्ट 2 जीर्णोद्धार 3विष्णुदास भावे 4रिले 1.0

प्रकाश योजना 1. गोष्टीची गोष्ट 2. तायडी जेव्हा 3.बदलते पक्षांचे कवी संमेलन

रंगभूषा 1. पक्ष्यांचे कवी संमेलन 2.गोष्टीची गोष्ट 3. तायडी जेव्हा बदलते

वेशभूषा १. गोष्टीची गोष्ट २.पक्षांचे कवी संमेलन ३.वयम मोठम खोटम

पार्श्वसंगीत 1. पक्ष्यांचे कवी संमेलन २.जीर्णोद्धार ३. आमची काय चूक

लेखक 1. गोष्टीची गोष्ट २. जीर्णोद्धार ३.  लहान मुलांची बाप गोष्ट ४. लाभले आम्हास भाग्य

दिग्दर्शक 1. गोष्टीची गोष्ट २. पक्ष्यांचे कवी संमेलन 3. तायडी जेव्हा बदलते

बालकलाकार मुलगा1. शर्व दाते,2. आरव कांबळे, 3. चैतन्य चव्हाण

बालकलाकार मुलगी१.अस्मि गोगटे २. भैरवी जोशी ३. कस्तुरी खैरनार

बालनाट्ये१. गोष्टीची गोष्ट २. पक्ष्यांचे कवी संमेलन ३. जीर्णोद्धार

 

टॅग्स :thaneठाणेMarathi Actorमराठी अभिनेताSachin Pilgaonkarसचिन पिळगांवकर